vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

जल्लोष लोककलेचा’ राज्यस्तरीय एकल गायन स्पर्धेत प्रथमेश दोडेकर प्रथम

‘जल्लोष लोककलेचा’ राज्यस्तरीय एकल गायन स्पर्धेत प्रथमेश दोडेकर प्रथम

ठाणे, प्रतिनिधी: बालरंगभूमी परिषदेतर्फे आयोजित ‘जल्लोष लोककलेचा २०२६’ या उपक्रमांतर्गत झालेल्या राज्यस्तरीय एकल गायन स्पर्धेत कु. प्रथमेश संदीप दोडेकर याने आपल्या दमदार आणि सुमधुर गायनाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले.लातूर येथे आयोजित करण्यात आलेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेत राज्याच्या विविध भागांतून आलेल्या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता

 प्रथमेशने आपल्या प्रभावी आणि सादरीकरणाने परीक्षकांची मने जिंकत अव्वल स्थान मिळविले.प्रथमेशच्या या उल्लेखनीय यशाबद्दल प्रसिद्ध मराठी चित्रपट, मालिका व नाट्य अभिनेत्री सौ. नीलम शिर्के-सामंत, ‘सा रे ग म प’च्या पहिल्या पर्वाचे विजेते श्री. मंगेश बोरगावकर तसेच लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या हस्ते त्याला पारितोषिक व सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले.प्रथमेश दोडेकर याच्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

*****

संबंधित पोस्ट

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन

बारामतीतील शासकीय रुग्णालय व आयुर्वेद महाविद्यालयाला ‘स्व. अजित (दादा) पवार’ यांचे नाव

नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित कामे वेळेत पूर्ण करा – मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले अतिवृष्टीबाधित भागातील रस्ते, पूल व इमारतींच्या दुरुस्तीच्या कामांना गती देण्याचे निर्देश

धारावीकरांसाठी खुशखबर- सिंगापूर आणि हाँगकाँगमधील आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा #पुनर्विकास करण्यात यावा.- प्रकल्प राबविताना धारावीतील नागरिक, त्यांची उपजीविका आणि स्थानिक वैशिष्ट्ये यांना केंद्रस्थानी ठेवण्यात यावे. ठरलेल्या कालावधीतच प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात यावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सेवा संकल्प अभियान;जास्तीतजास्त नागरिकांपर्यंत योजनांचे लाभ पोहोचवा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

vishwatmaklokswamivarta

त्र्यंबक-नाशिकमध्ये सिंहस्थकुंभमेळा २०२७ चे आयोजन-कुंभमेळ्याच्या माध्यमातून येथे येणारा प्रत्येक भाविक भारताचे पर्यायाने महाराष्ट्राचे प्रतिबिंब सोबत नेणार आहे. त्यामुळे यशस्वी आयोजनातून जगाला आकर्षण वाटणारा कुंभमेळा करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.