vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

हिवाळी अधिवेशनात ‘पीसीपीएनडीटी’ कायद्यात सुधारणा विधेयक आणणार – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर वारंवार गुन्हा करणा-यांवर मोका लावणार; बोगस डॉक्टरांची यादी होणार प्रसिद्ध

हिवाळी अधिवेशनात ‘पीसीपीएनडीटी’ कायद्यात सुधारणा विधेयक आणणार – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर-वारंवार गुन्हा करणा-यांवर मोका लावणार; बोगस डॉक्टरांची यादी  होणार प्रसिद्ध

मुंबई, प्रतिनिधी : प्रसुतीपूर्व गर्भ लिंग निदान करून स्त्री भ्रुण हत्या करणा-या डॉक्टरांवर कठोर कारवाई होण्यासाठी गर्भधारणा पूर्व व प्रसुतीपूर्व निदानतंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा १९९४ व २००३ मध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. असे गुन्हे करणाऱ्या डॉक्टरांवर लावण्यात येणारे कलम अधिक कठोर करण्यासोबतच, गुन्हेगारांवर मोक्का लावणे, गुन्हे सिद्धता आणि शिक्षा यात बदल करणे आवश्यक असून येत्या हिवाळी अधिवेशनात या कायद्यात सुधारणा विधेयक सादर करण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

गर्भधारणा पूर्व व प्रसुतीपूर्व निदानतंत्रे लिंग निवडीस प्रतिबंध कायदा १९९४ व २००३ च्या कठोर अंलबजावणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कृती दलाची पहिली बैठक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली, यावेळी ते बोलत होते. यावेळी कृती दलाच्या अध्यक्ष आमदार डॉ. निलम गोऱ्हे, सदस्य आमदार मनीषा कायंदे, आमदार उमा खापरे, आणि आमदार स्नेहा दुबे – पंडीत व आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर उपस्थित होते.

राज्यस्तरीय कृती दलाचे काम जिल्हा स्तरापर्यंत पोहचवणे आवश्यक आहे. जेणेकरुन जिल्हा स्तरावरून याबाबत तक्रारी प्राप्त होतील. यासाठी समितीचा कालबद्ध कार्यक्रम ठरविण्यात यावा. तसेच या कामासाठी समर्पित अधिकारी आणि कर्मचारी यांचा चमू नेमून देण्यात यावा. नोंदणी नसलेल्या बोगस डॉक्टरांची यादी तयार करून प्रसिद्ध करण्यात यावी जेणेकरून बोगस डॉक्टरांची माहिती नागरिकांना मिळून त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचे काम जनताही करेल. अशा बोगस डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही मंत्री आबिटकर यांनी दिले.

सध्या बाजारात सोनोग्राफी करण्यासाठी पोर्टेबल मशीन उपलब्ध आहेत. तशा जाहिराती गुगलवर दिसतात यासंदर्भात सर्वेक्षण करुन अशा उत्पादनावर बंदी घालण्यात यावी. शिवाय पशुंसाठी वापरण्यात येणा-या सोनोग्राफी मशीनचा वापर मनुष्यासाठी होतोय का याची शहानिशा करण्यात यावी. जिल्हास्तरीय समित्यांचा आढावा घेण्यासाठी हिवाळी अधिवेशापूर्वी सर्व जिल्ह्यांमध्ये बैठका घेण्यात याव्यात कायद्याची जनजागृती करणा-यांना अधिक सक्षम व कार्यक्षम करण्यासाठी कार्यशाळा घेण्यात याव्यात अशा सूचनाही आरोग्यमंत्री आबिटकर यांनी केल्या.

 

000

संबंधित पोस्ट

पाणीपट्टी थकविणाऱ्या ग्रामपंचायतींना आवाहन 

मोर्शी येथील मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे काम वेळेत पूर्ण करा – मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

लातूर जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने लातूर तालुक्यातील निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांनी निवडणूक संबंधित नोडल अधिकारी यांची बैठक

vishwatmaklokswamivarta

जिजाऊ च्या समाजाभिमुख उपक्रमांमुळे प्रेरित हजारो विद्यार्थी व नागरिकांकडून मा. श्री. निलेश भगवान सांबरे यांना गुरुपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा!

गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी दुर्गम उळुंबमध्ये जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचा मुक्काम**जिल्हाधिकाऱ्यांच्या साधेपणाने गावकरी भारावले*

उपतालुकाप्रमुख अर्जुन पाटील -ठोंबरे यांच्या संघर्षाला यश;स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच जाफराबाद–छत्रपती संभाजीनगर एसटी सुरू-माहोरा – बरंजळा साबळे – नळणी – जवखेडा ठोंबरे – केदारखेडा – राजूर –तळेगाव – फुलंब्री मार्गावरील हजारो नागरिकांना दिलासा; जवखेडा ठोंबरे नगरीत येथे चालक-वाहकांचा जाहीर सत्कार