vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोयाबीन पीक कापणी प्रयोग

जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोयाबीन पीक कापणी प्रयोग

 

 अमरावती, प्रतिनिधी : कृषी, महसूल व जिल्हा परिषद विभागामार्फत राज्यातील प्रमुख पिकांच्या उत्पादनाचा अंदाज आणि आढावा घेण्यासाठी पीक कापणी प्रयोगांचे आयोजन केले जाते. आज तळखंडा, ता. अमरावती येथे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या उपस्थितीत सोयाबीन पीक कापणी प्रयोग करण्यात आला.

तळखंडा येथे आज शेतकरी प्रवीण ढोरे यांच्या शेतात सोयाबीन पीक कापणी प्रयोग पार पडला. यामध्ये पीक कापणी प्रयोगाच्या प्लॉटमधून ३.१३० किलो म्हणजेच प्रतिहेक्टरी ६.२६ क्विंटल सोयाबीनचे उत्पन्न मिळाले. या प्रयोगांतून प्राप्त होणाऱ्या आकडेवारीचा उपयोग सरासरी उत्पन्न, पैसेवारी आणि पीक विमा योजना ठरवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

अमरावती तालुक्यात सोयाबीनच्या नियोजित १२६ पीक कापणी प्रयोगांपैकी ५१ प्रयोग पूर्ण झाले आहे. उर्वरित प्रयोग मार्गदर्शक सूचनेनुसार वेळेत पूर्ण केले जाणार आहे, अशी माहिती कृषी विभागाने दिली.यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, पंकज चेडे, तहसीलदार विजय लोखंडे, तालुका कृषी अधिकारी प्रशांत गुल्हाने, गट विकास अधिकारी, कृषी व महसूल विभागाचे क्षेत्रिय कर्मचारी, ग्रामस्तरीय समिती सदस्य, इफ्को टोकियो विमा कंपनीचे प्रतिनिधी आणि स्थानिक शेतकरी उपस्थित होते.

अचूक व पारदर्शक प्रयोगांचे निर्देश पीक कापणीच्या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थितांकडून पिकांची सद्यस्थिती, उत्पादनाचा अंदाज आणि शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच, पीक कापणी प्रयोग अत्यंत अचूक आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

 

0000

संबंधित पोस्ट

बालगृहातील ७१५ बालके दहावीत उत्तीर्ण; मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून अभिनंदन

बुलढाण्यात नूतन जिल्हाधिकाऱ्यांचे जल्लोषात स्वागत; डॉ. किरण पाटील यांना भावपूर्ण निरोप-विकासकामे वेगाने पुढे नेण्याचा संकल्प-डॉ.प्रविणकुमार देवरे

शिष्यवृत्ती परीक्षेचा “शहापूर पॅटर्न” : नियोजन, सामाजिक सहभाग आणि शिक्षकांच्या अथक परिश्रमातून घडले यश

अन्न व औषध प्रशासनाकडून आंबेगाव व खेड तालुक्यात ५ ठिकाणी धडक कारवाईकारवाईत १९ लाखाहून अधिक रकमेचा साठा जप्त

बीड जिल्ह्यातील भूसंपादन मावेजा वाटपाच्या गैरव्यवहारातील  ७३ कोटींची रक्कम वसूल करणार- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नागरी सेवा परीक्षा 2025 मध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांपैकी जवळपास एक तृतीयांश महिला आहेत; नवीन भारत महानगरांच्या पलीकडे व्यापक सहभागाचा साक्षीदार होत आहे : डॉ जितेंद्र सिंह

vishwatmaklokswamivarta