vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026,1 हजार 334 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची तिसरी यादी प्रसिद्ध लाभार्थ्याने आधार प्रमाणीकरण करावे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026,1 हजार 334 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची तिसरी यादी प्रसिद्ध लाभार्थ्याने आधार प्रमाणीकरण करावे

रायगड-अलिबाग प्रतिनिधी) : राज्य शासनाने दि.02 जून 2026 रोजीच्या शासन निर्णयान्वये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 ही योजना सुरु केली आहे. या योजनेतंर्गत जिल्ह्यातील तिसऱ्या यादीमधील पात्र लाभार्थी शेतकरी लाभार्थ्यांची यादी बँक शाखा, विकास संस्था व ग्रामपंचायतीमध्ये प्रसिध्द करण्यात येणार आहे. महा-ई-सेवा केंद्रे (Maha e-Seva Kendra) व कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) येथे जाऊन करावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक तनवीर पाटील यांनी केले आहे. राज्य शासनाने दि.02 जून 2026 रोजीच्या शासन निर्णयान्वये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 ही योजना सुरु केली आहे. या योजनेतंर्गत दि.01 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत वितरित झालेल्या व दि.30सप्टेंबर 2025 पर्यंत थकित असलेल्या व दि. 31 मार्च 2026 पर्यत परतफेड न झालेल्या पीक कर्ज व पुनर्गठित / फेरपुनर्गठित कर्जास रुपये दोन लाखापर्यत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे.

   या योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत असून यासाठी शासनाने महाआयटी यांची नियुक्ती केली आहे. या योजनेसाठी महाआयटी यांनी तयार केलेल्या योजना पोर्टलवर रायगड जिल्ह्यातील बँकांनी एकूण 12 हजार 682 थकीत कर्ज खात्यांची माहिती अपलोड केली आहे. महाआयटी यांनी संगणकीय संस्करण करुन 7 हजार 367 शेतकऱ्यांची पहिली यादी, व दि.11 सप्टेंबर 2026 रोजी 1 हजार 374 शेतकऱ्यांची दुसरी यादी आणि दि.12 ऑक्टोबर 2026 रोजी 1 हजार 334 शेतकऱ्यांची तिसरी यादी अशी आज अखेर एकूण 10 हाजार 075 लाभार्थी शेतकऱ्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

याबाबत पुढील प्रमाणे सुचना देण्यात येत आहेत. ही यादी कर्जमुक्तीची आहे. या यादीतील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येत आहे. या यादीतील शेतकऱ्यांच्या कर्जबाकीची रक्कम दि.31 मार्च 2026 रोजीची आहे. दि.01 एप्रिल 2026 रोजी नंतरचे व्याज व इतर खर्च माफ करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी दि.31 मार्च 2026 रोजीच्या कर्ज थकबाकीची खातरजमा करुन नजीकच्या आपले सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करावे. या यादीतील राष्ट्रीयकृत आणि व्यापारी बँकेसंदर्भात काही शेतकऱ्यांच्या दि.31 मार्च 2026 रोजीची कर्ज थकबाकीची रक्कम रु. 2 लाखापेक्षा जास्त असली तरी शासनाच्या हेअर कट धोरणानुसार ही सर्व कर्ज निरंक करण्यात येणार आहेत. योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांमध्ये मयत झालेल्या तसेच वयस्कर व बोटांच्या ठशाची नोंद होत नसलेल्या लाभार्थ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्याचे अनुषंगाने दि. 19 ऑगस्ट 2026 रोजी मानक कार्यप्रणाली (SOP) निर्गमीत करण्यात आलेली आहे. आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर कर्जमुक्तीची रक्कम त्यांच्या कर्ज खात्यावर जमा करण्यात येणार आहे.

 

संबंधित पोस्ट

रायगड जिल्ह्यातील नागरिकांनी मतदारयादीतील ‘मॅपिंग’ प्रक्रियेत सहभागी व्हावे– जिल्हाधिकारी किशन जावळे

प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू होणार ‘मराठी भाषा विकास कक्ष’मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची व्हीसी

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे : रावसाहेब पाटील दानवे बदनापूर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी – शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदतीचे आश्वासन

vishwatmaklokswamivarta

प्रशासन मतदानासाठी सज्ज : विभागीय आयुक्तांनी घेतला आठही जिल्ह्यांचा आढावामतदान केंद्रांवरील सुविधा, सुरक्षा व राजकीय पक्षांच्या बूथ व्यवस्थेची तपासणीशुक्रवार 23 ऑक्टोबरला सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत होणार मतदान

vishwatmaklokswamivarta

माणगाव तालुक्यातील खरबाची आदिवासी वाडीत जिल्हाधिकारी किशन जावळे यांची भेट; ग्रामस्थांशी थेट संवाद 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-डेन्मार्कच्या राजदूत यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट

vishwatmaklokswamivarta