vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

जात पडताळणीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन

जात पडताळणीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन

 सांगली, प्रतिनिधी: शासन निर्देशानुसार महासंचालक, बार्टी पुणे यांच्या स्तरावरुन सीसीव्हीआयएस प्रणाली बदलून नवीन https://cvc.barti.in प्रणाली दि. 12 ऑक्टोबर 2026 पासून ‘पेपरलेस व फेसलेस’ संगणकीय प्रणाली सुरू करण्यात आली आहे. नव्या प्रणालीनुसार अर्जदारांना ऑनलाईन जात प्रमाणपत्र पडताळणी करीता अर्ज केल्यानंतर संबंधित जिल्ह्यातील जात पडताळणी समितीच्या कार्यालयात जाऊन अर्जाची आणि जोडलेल्या कागदपत्रांची हार्ड कॉपी जमा करण्याची आवश्यकता नाही. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आणि पेपरलेस व फेसलेस करण्यात आली असल्याचे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सांगली चे उपायुक्त तथा सदस्य नागनाथ चौगुले यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

 प्रसिध्दीपत्रकात म्हटल आहे की, अर्ज सादर केल्यापासून ते प्रमाणपत्र मिळेपर्यंत प्रक्रिया कोणत्या टप्प्यावर आहे, याचे ऑनलाईन ट्रॅकिंग करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. जात पडताळणी समितीला अर्जदाराने सादर केलेल्या कागदपत्रांबाबत किंवा जातीच्या पुराव्याबाबत काही शंका असल्यास संबंधित अर्जदाराशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधला जाणार आहे. या माध्यमातून ऑनलाईन चर्चा आणि सुनावणी घेऊन अर्जदाराचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. त्यानंतर सादर केलेले पुरावे आणि उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे समितीकडून गुणवत्तेनुसार निर्णय घेतला जाईल. जात पडताळणीच्या कागदपत्राबाबत सुनावणी आवश्यक असलेल्या प्रकरणांमध्ये जात पडताळणी समितीकडून अर्जदाराला तीन तारखा दिल्या जाणार आहेत. त्यापैकी सोयीची तारीख निवडून अर्जदाराला ऑनलाईन सुनावणीची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.

 महसूल विभागाकडून यापूर्वी वितरित करण्यात आलेल्या जात प्रमाणपत्रांचा (कास्ट सर्टिफिकेट) डिजिटल डेटा टीसीएसच्या नव्या प्रणालीशी जोडण्यात आला आहे. त्यामुळे अर्जदाराने सादर केलेल्या जात प्रमाणपत्राची माहिती उपलब्ध करून घेणे आणि पडताळणीच्या वेळी संबंधित नोंदी तपासणे अधिक सोपे होणार आहे. अर्जदाराने कोणत्याही प्रकारे कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही, अर्ज सादर करणे, त्रुटी जमा करणे, सुनावणी ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन असणार आहे. त्यामुळे अर्जदारांनी स्वत:चा मोबाईल नंबर व ईमेल अचूक नमुद करण्याची दक्षता घ्यावी, असे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

१३ तासात ३०० किमी सायकलिंग पूर्ण :कैलास झोळगे ठरले पोडियम फिनिशर्स

सार्वजनिक आरोग्य विभागासाठी सर्वसमावेशक बदली धोरण लागू

रोजंदारी कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत घेण्यासाठी विधि व न्याय विभागाचे मार्गदर्शन घ्यावे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

भात लावणीसाठी यांत्रिकी पद्धतीबाबत 22 एप्रिल रोजी विशेष डिजिटल शेती शाळेचे आयोजन 

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील तापमानात वाढ उष्माघातापासून बचावासाठी जिल्हा प्रशासनाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

रायगड जिल्ह्यात 15 दिवस ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत सूट-जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे आदेश, शांतता क्षेत्रात सूट लागू नाही

vishwatmaklokswamivarta