श्रीदेवी सूर्यवंशी यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान-बी. दि. चेंज फाउंडेशन, शिर्डीच्या वतीने सन्मान; शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव
जालना (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, विठ्ठलनगर, केंद्र गोलापांगरी, जालना येथे कार्यरत असलेल्या श्रीमती श्रीदेवी व्यंकटराव सूर्यवंशी यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. बी. दि. चेंज फाउंडेशन, शिर्डी (जिल्हा अहिल्यानगर) यांच्या वतीने २५ ऑक्टोबर रोजी आयोजित पुरस्कार सोहळ्यात फाउंडेशनच्या अध्यक्षांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले अथक प्रयत्न, शैक्षणिक कार्यातील निष्ठा, समर्पणभावना आणि विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी घेतलेली मेहनत यांची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, सकारात्मक दृष्टिकोन आणि सर्जनशीलता विकसित करण्यासाठी शिक्षकांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरते. या कार्याची पोचपावती म्हणून श्रीदेवी सूर्यवंशी यांना सन्मानित करण्यात आले. गौरव शिक्षकांच्या कार्याचा, अस्मितेचा आणि स्वाभिमानाचा या भावनेतून प्रदान करण्यात आलेला हा पुरस्कार त्यांच्या शैक्षणिक प्रवासातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. त्यांच्या कार्यामुळे इतर शिक्षकांनाही प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या पुरस्काराबद्दल श्रीदेवी सूर्यवंशी यांचे शैक्षणिक क्षेत्रातील सहकारी, मित्रपरिवार आणि नातेवाइकांकडून अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहे