vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

दिवाळीचा फराळ देशा-परदेशात पाठवण्यासाठी कराड डाक विभागामार्फत २४ तास पार्सल बुकिंग सेवा उपलब्ध*

दिवाळीचा फराळ देशा-परदेशात पाठवण्यासाठी कराड डाक विभागामार्फत २४ तास पार्सल बुकिंग सेवा उपलब्ध*

सातारा, प्रतिनिधी :- दिवाळी हा आनंदाचा, प्रेमाचा आणि आपुलकीचा सण. दिवाळीनिमित्त आपल्या प्रियजनांना घरगुती फराळ, मिठाई, भेटवस्तू आणि स्नेहाच्या शुभेच्छा पाठविण्यासाठी भारतीय डाक विभागाने नागरिकांना टपाल सेवाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. अधिक्षक डाकघर कराड विभाग कराड येथे २४ तास पार्सल बुकिंग सेवा उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या सोयीनुसार पार्सल बुकिंग करता येणार आहे. देशाच्या विविध भागांत तसेच परदेशात राहणाऱ्या नातेवाईकांना, मित्रांना आणि आप्तस्वकीयांना दिवाळीचा फराळ व भेटवस्तू पाठविण्यासाठी ही सेवा उपयुक्त ठरणार आहे

महाराष्ट्रासह देशाच्या विविध राज्यांमध्ये घरगुती दिवाळी फराळ, भेटवस्तू आणि इतर पात्र वस्तू पाठविण्यासाठी ग्राहक भारतीय डाक विभागाच्या देशांतर्गत पार्सल सेवांचा लाभ घेऊ शकतात. परदेशात वास्तव्यास असलेल्या आपल्या प्रियजनांपर्यंत दिवाळीचा आनंद पोहोचविण्यासाठी आंतरराष्ट्रीय पार्सल बुकिंगची सुविधा उपलब्ध आहे संबंधित देशाचे आयात नियम, खाद्यपदार्थ पाठविण्यावरील निर्बंध आणि भारतीय डाक विभागाच्या अटी यांची माहिती घेऊनच फराळाचे पार्सल बुक करावे. दिवाळीच्या काळात पार्सल पाठविण्यासाठी होणारी गर्दी आणि वेळेची अडचण लक्षात घेता, सातारा सॉर्टिंग पोस्ट ऑफिसमधील २४ तास बुकिंग सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावा. व्यापारी, व्यावसायीक, गृहउद्योग चालक, महिला बचत गट आणि फराळ उत्पादकांनीदेखील आपल्या उत्पादनांची देशभरात तसेच परदेशात पाठवणी करण्यासाठी भारतीय डाक विभागाच्या सेवांचा लाभ घ्यावा,असे आवाहन अधीक्षक कराड विभाग कराड, यांनी केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त पूर्वतयारीचा आढावा

कृषी दिनानिमित्त प्रगतिशील शेतकऱ्यांचा गौरव; 22 शेतकऱ्यांना पुरस्कार प्रदान

स्वाधार’ योजनेतील त्रृटी पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ

कापूस श्रेडरसाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेतकापूस उत्पादकता अभियानांतर्गत अनुसूचित जाती-जमातीच्या शेतकऱ्यांना ७५ हजार, तर सर्वसाधारण प्रवर्गाला ६० हजार रुपयांपर्यंत अनुदान

vishwatmaklokswamivarta

श्रीम.विजया चामे यांचे रस्ता सुरक्षा दूत म्हणून अत्यंत कौतुकास्पद कार्य

गडचिरोलीतील रस्ते-पुलांच्या गुणवत्तेत तडजोड नको; निकृष्ट कामांवर कठोर कारवाई – मंत्री शिवेंद्रराजे भोंसले पुलांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे स्वतंत्र ‘विशेष पॅकेज’ची मागणी करणार