vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

शेतकरी आंदोलन,केंद्र सरकारने अद्यापही आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत. सरकार मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत शेतकरी आंदोलनावर ठाम राहतील”, असं टिकैत म्हणाले.

शेतकरी आंदोलन,केंद्र सरकारने अद्यापही आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत. सरकार मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत शेतकरी आंदोलनावर ठाम राहतील”, असं टिकैत म्हणाले.

नवी दिल्ली प्रतिनिधी  : राजधानीच्या सिंघू बॉर्डरवर शेतकरी संघटनांची बैठक आहे. त्यामुळे पंतप्रधानांच्या आवाहनानंतर आज शेतकरी आंदोलन मागे घेणार का? अशी चर्चा होती. पण, आता शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी शेतकरी आंदोलनाबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे.

शेतकरी आंदोलन मागे घेणार का? -गेल्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी तीन कृषी कायदे रद्द केले होते. त्यानंतर शेतकऱ्यांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले होते. मात्र, सरकार संसदेत कायदे रद्द करत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतली होता. आता सरकारने संसदेच्या हिवाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी कायदे मागे घेतले. त्यानंतर आता शेतकरी आंदोलन मागे घेणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्याबाबतच राकेश टिकैत यांनी उत्तर दिले आहे. ”आजची बैठक ही फक्त शेतकरी संघटनांमध्ये आहे. येत्या ४ डिसेंबरला संयुक्त किसान मोर्चाची बैठक होणार आहे. मात्र, केंद्र सरकारने अद्यापही आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत. सरकार मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत शेतकरी आंदोलनावर ठाम राहतील”, असं टिकैत म्हणाले.

सूत्रांच्या माहितीनुसार, 32 पैकी सुमारे 20-22 संघटनांचं आंदोलन मागे घेण्यावर एकमत झालं. तर सुमारे 8-10 संघटना उर्वरित मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा विचार करत आहेत. दरम्यान, पंजाबचे जोगिंदर सिंह उग्राहान आणि हरियाणाचे सरवन सिंह पंढेर गुरनाम चधुनी यांसारखे मोठे शेतकरी नेते संप सुरु ठेवण्याच्या बाजूने आहेत. सिंघू आणि टिकरी सीमेवर त्यांच्या संघटनेचे शेतकरी मोठ्या संख्येने ठाण मांडून आहेत. आता राकेश टिकैत यांनी देखील शेतकरी आंदोलन सुरूच राहणार असं सांगितलं आहे.

 

 

संबंधित पोस्ट

दत्त जयंती निमित्त वारी उत्सव सोहळ्याचे आयोजन…

vishwatmaklokswamivarta

केस व नख गळतीच्या आजारावर नियंत्रणासाठी केंद्रीय पथकाला निर्देश-केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव

महाराष्ट्रातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, १७ पोलिस अधिकाऱ्यांना ‘पोलीस शौर्य पदक’ तर ३९ पोलिस कर्मचाऱ्यांना ‘पोलीस पदक” प्रदान

अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत औरंगाबाद रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाची पायाभरणी…… प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ कॉन्फरसिंगव्दारे संवाद, केंद्रिय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज ठाणे दौऱ्यानिमित्त वालावलकर सभा मैदान,तात्पुरते रेड झोन घोषित…

जलजीवन मिशन अंतर्गत योजनेतील कामांचे सुधारित प्रस्ताव तातडीने सादर करावे-पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील