vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

राष्ट्रीय काँग्रेस 137 वा वर्धापन दिवस ,मुंबई अध्यक्ष भाई जगताप ,चरणसिंग सपरा यांच्या मार्गदर्शनामध्ये मुंबईतील जिल्हाध्यक्ष,ब्लॉक अध्यक्ष यांच्या तुफान गर्दीत व अतिशय उत्साहात पार पडला…

 राष्ट्रीय काँग्रेस 137 वा वर्धापन दिवस मुंबई प्रदेश अध्यक्ष भाई जगताप तसेच चरणसिंग सपरा यांच्या मार्गदर्शनामध्ये संपूर्ण मुंबईतील जिल्हाध्यक्ष,ब्लॉक अध्यक्ष यांच्या तुफान गर्दीत व अतिशय उत्साहात पार पडला…

 

मुंबई प्रतिनिधी :28 डिसेंम्बर 1885 साली ज्या तेजपाल हॉल मध्ये काँग्रेस पक्षाची स्थापना झाली होती,त्याच तेजपाल सभागृहात मुंबई प्रदेश कॉग्रेस कमिटीच्या विद्यमाने आज 28 डिसेंबर 2021 रोजी 137 वा वर्धापन दिवस मुंबई प्रदेश अध्यक्ष भाई जगताप तसेच चरणसिंग सपरा यांच्या मार्गदर्शनामध्ये संपूर्ण मुंबईतील जिल्हाध्यक्ष,ब्लॉक अध्यक्ष यांच्या तुफान गर्दीत व अतिशय उत्साहात पार पडला.

यावेळी सेवादलाच्या सलामीने सुरवात झालेल्या कार्यक्रमास काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते,नगरसेवक,माजी नेते,मंत्रीगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.या सभेस संभोदीत करताना चरणसिंग सपरा यांनी कॉग्रेस ची 137 वर्षांची परंपरा समोर ठेवली,माणिकराव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले,माजी मंत्री नसीम खान यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत आणि 2024 मध्ये काँग्रेस पुन्हा एकहाती सत्ता घेईल अशी ग्वाही दिली तर ज्या सभागृहात काँग्रेस ची स्थापना झाली त्याच सभागृहातून एके काळी फिरंगीयों चले जाव ची घोषणा दिली होती त्याच सभागृहातून आज पासून भाजपा चले जावो चा नारा लावला.आणि अब तक लडे थे गोरोंसे,अब लाडेणगे भाजपा के चोरो से हा मंत्र कार्यकर्त्यांमध्ये दिला.

तुडुंब भरलेल्या सभागृहात कार्यकर्त्यांचा उत्साह आज द्विगुणीत झाल्याचे चित्र दिसत होते.

संबंधित पोस्ट

आशय निर्मितीत भारत जागतिक स्तरावर उत्कृष्ट व्यावसायिक भागीदार बनण्यास सज्ज· ‘लाईट्स, कॅमेरा, एक्सआर: व्हर्च्युअल प्रॉडक्शन इज रिशेपिंग ग्लोबल सिनेमा’ परिसंवाद

बदनापूर: तालुक्यातील माळीवाडा येथील अनुश्री सुनील भगत हिने भारतातील प्रतिष्ठेची  होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत यश…

vishwatmaklokswamivarta

विधवा’ उल्लेखाला महिला आयोगाची हरकत; मंगलप्रभात लोढा यांची पत्रकार परिषदेत माहिती

राज्यातील 4 लाख 92 हजार 532 असाक्षरांनी दिली**पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणीची परीक्षा*

vishwatmaklokswamivarta

तंत्रज्ञानाच्या नव्या युगात – ‘एआय’चा वाढता प्रभाव- कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञ किशोर जस्मानी

vishwatmaklokswamivarta

विशेष लेख :- युवा पिढीच्या प्रगतीसाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना