
लग्नमंडपात पोहोचण्यापूर्वीच कार नदीत कोसळली, नवरदेवासह ९ जणांचा मृत्यू
धुमधडाक्यात लग्नाची तयारी केली. नवरदेव वऱ्हाड घेऊन लग्नासाठी निघाला. सर्वजण आनंदात होते. पण, हा आनंद जास्त काळ टीकू शकला नाही. लग्नमंडपात पोहोचण्यापूर्वीच कार नदीत कोसळली. यामध्ये नवरदेवासोबत ९ वऱ्हाड्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
उज्जैन येथे लग्न होतं. त्यासाठी वऱ्हाड बरवाडा येथील चौथ येथून नवरदेवाला घेऊन उज्जैनला निघालं होतं. पण, लग्नमंडपात पोहोचण्यापूर्वीच कोटा येथील चंबलजवळ नवरदेवाची कार नदीमध्ये कोसळली. यामध्ये नवरदेवासोबत ९ वऱ्हाड्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने कार आणि मृतदेह बाहेर काढण्यात आले. ७ मृतदेह कारमध्ये होते, तर दोघांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. चंबल नदीत कार कोसळताना एका प्रवाशाने पाहिली. यानंतर महामंडळाच्या पथकाने पहाटे बचावकार्य हाती घेतले. क्रेनच्या सहाय्याने गाडी बाहेर काढण्यात आली. सर्व मृतदेह एमबीएसच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत, असं कोटा येथील पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.



