
आज वाजपेयींचा पक्ष संसदेला रोमच्या कोलासिमयसारखे बनवत. संसदेत ‘मोदी मोदी’ नावाचा जप,. ही सर्वात मोठी शोकांतिका,महुआ मोइत्रा.
नवी दिल्ली प्रतिनिधी:
भाजप सरकारने संसदेचे रुपांतर रोमच्या कोलोसियममध्ये केले आहे. संसदेमध्ये ‘मोदी-मोदी’ असे नारे लावले जातात. दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (A) यांची सर्वात मोठी भीती त्यांच्याच पक्षाच्या सरकारमध्ये खरी ठरली, असा निशाणा तृणमूलच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी लोकसभेत साधला.
उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या चार राज्यांमध्ये भाजपच्या दणदणीत विजयानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपच्या (BJP) खासदारांनी ‘मोदी-मोदी’ असे नारे लावले. त्यावरून मोहुआ मोइत्रा यांनी टीका केली आहे. अटलबिहारी वाजपेयी यांनी १९७२ मध्ये संसदेत केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देत महुआ मोइत्रा म्हणाल्या, ”आजकाल नवी दिल्लीतील वातावरणात गुदमरल्यासारखं होते. इथं मोकळा श्वास घेणे शक्य नाही. ऑल इंडिया रेडिओवर सकाळपासून रात्रीपर्यंत पंतप्रधानांच्या नावाचा जप केला जातो. चित्रपट दाखवताना पडद्यावर प्रचार केला जातो. विरोधी पक्षनेते लोक कसे लढणार? असं वाजपेयी म्हणाले होते. वाजपेयींची सर्वात मोठी भीती आज त्यांच्याच पक्षाच्या सरकारमध्ये खरी ठरली आहे. आज वाजपेयींचा पक्ष संसदेला रोमच्या कोलासिमयसारखे बनवत आहे. संसदेत ‘मोदी मोदी’ नावाचा जप केला जातो. ही भारतातील सर्वात मोठी शोकांतिका आहे.”



