vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महाराष्ट्रात श्रावणमासारंभ 29 जुलै पासून; श्रावणी सोमवार व्रत, मंगळागौर सह या पवित्र महिन्यातील सण, व्रतांच्या जाणून घ्या तारखा

 महाराष्ट्रात श्रावणमासारंभ 29 जुलै पासून; श्रावणी सोमवार व्रत, मंगळागौर सह या पवित्र महिन्यातील सण, व्रतांच्या जाणून घ्या तारखा…

 

श्रावण हा एक पवित्र महिना असल्याने अनेकजण या महिन्यात मांसाहार टाळतात. या महिन्यात सण, व्रत समारंभांची रेलचेल असते.

महाराष्ट्रामध्ये आषाढ अमावस्येनंतर म्हणजे आजपासून ठीक 15 दिवसांनंतर श्रावण महिन्याची (Shravan Month) सुरूवात होणार आहे. राज्यात 29 जुलै 2022 पासून श्रावण महिन्याला (Shravan Maas) सुरूवात होत आहे. हिंदू धर्मीयांसाठी श्रावण महिना हा पवित्र महिन्यांपैकी एक आहे. या महिन्यात सण, व्रत समारंभांची रेलचेल असल्याने सारंच उत्साहाचे, जल्लोषाचे, आनंदाचे वातावरण असते. नागपंचमी (Nagpanchami) या पहिल्या सणाने श्रावण महिन्यात सणांची सुरूवात होते. तर बैलपोळा (Bailpola) हा शेवटचा सण साजरा केला जातो. श्रावण हा एक पवित्र महिना असल्याने अनेकजण या महिन्यात मांसाहार टाळतात. आषाढी अमावस्या ही गटारी अमावस्या म्हणून साजरी करत मांसाहारावर ताव मारला जातो आणि पुढे महिनाभर मांसाहार, मद्यसेवन टाळले जाते. वातावरणामधील चैतन्य कळत नकळत आपल्याही आयुष्यात घेऊन येणार्‍या या श्रावण महिन्यात पहा कोणते सण, व्रत-समारंभ कधी आहेत?

आषाढ अमावस्येनंतर श्रावण महिन्याची सुरूवात होते. यंदा  आषाढ अमावस्या 28 जुलैच्या रात्री 11 वाजून 24 मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे दुसरा दिवशी 29 जुलैपासून श्रावणमासारंभ होईल. 

श्रावणी सोमवार 2022

श्रावणी सोमवारी शंकराची पूजा करून त्याला बेल आणि शिवमूठ अर्पण करण्याची प्रथा आहे.

पहिला श्रावणी सोमवार – 1 ऑगस्ट

दुसरा श्रावणी सोमवार – 8 ऑगस्ट

तिसरा श्रावणी सोमवार – 15 ऑगस्ट

चौथा श्रावणी सोमवार – 22 ऑगस्ट

मंगळागौरी पूजन 2022

नववधूंसाठी मंगळागौरीचा सण मोठा आनंदाचा असतो. यंदा 2,9,16,23 ऑगस्ट दिवशी मंगळागौरी पूजन करून खेळ खेळले जाणार आहेत.

जरा-जिवंतिका पूजन 2022

दर शुक्रवारी जरा-जिवंतिका पूजन करण्याची प्रथा आहे. यंदा श्रावण महिन्याची सुरूवातच जरा-जिवंतिका पूजनाने होणार आहे. हे पूजन यंदा 29 जुलै, 5,12,19,26 ऑगस्ट दिवशी होणार आहे.

दरम्यान श्रावण महिन्याची सुरूवात झाली की पहिला सण नागपंचमीचा असतो तो यंदा 2 ऑगस्टला आहे. त्यानंतर 11 ऑगस्टला रक्षा बंधन आणि नारळी पौर्णिमा साजरी केली जाईल. 18 ऑगस्टला श्रीकृष्ण जयंती आणि 19ऑगस्टला गोपाळकाला आहे. तर श्रावण महिन्याची सांगता 26 ऑगस्टला बैलपोळ्याने होणार आहे.

 

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री निवासस्थान ‘वर्षा’ बंगल्यावर गणरायाची प्राणप्रतिष्ठा संपन्न; एकनाथ शिंदेंनी सहकुटुंब केली आरती

पंजाब येथील भटिंडाच्या मिलिट्री स्टेशनवर गोळीबार; 4 ठार, संपूर्ण परिसर सील…

vishwatmaklokswamivarta

विशेष सहाय्याच्या योजनांचे अनुदान डिबीटी प्रणालीद्वारे मिळणार*- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*पुढील १०० दिवसांमध्ये सामाजिक न्याय विभागाने करावयाच्या कामाचा घेतला मुख्यमंत्र्यांनी आढावा*

पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते जालना पोलीस दलासाठी वाहनांचे लोकार्पण29 बोलेरो व 15 मोटारसायकल पोलीस दलाकडे सुपूर्द

vishwatmaklokswamivarta

विधानसभा लक्षवेधी सूचना :शहरातील शाळा इमारतींच्या फायर ऑडिट संदर्भात आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना– नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

आज राम नवमी निमित्त मुंबईतील हरे कृष्ण इस्कॉन मंदिरात शोभायात्रा तर अयोद्धेमध्ये भाविक मोठ्या संख्येने श्री प्रभू श्रीराम यांच्या दर्शनास लाखोच्या संख्येने उपस्थित

vishwatmaklokswamivarta