vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

जगातील जवळजवळ 99 टक्के मंकीपॉक्स प्रकरणे ही पुरुषांच्या समलिंगी लैंगिक संबंधाशी निगडीत’- Dr Ishwar Gilada

जगातील जवळजवळ 99 टक्के मंकीपॉक्स प्रकरणे ही पुरुषांच्या समलिंगी लैंगिक संबंधाशी निगडीत’- Dr Ishwar Gilada

नवी दिल्ली प्रतिनिधी

म्हणतात, ‘सध्या मंकीपॉक्सवर कोणताही परिपूर्ण उपचार नाही. स्मॉलपॉक्सची लस या रोगावर उपयुक्त ठरू शकते आणि मंकीपॉक्सच्या उपचारासाठी उपचारात्मक एजंट म्हणून काम करू शकते.’

जगभरात मंकीपॉक्सच्या घटनांमध्ये वाढ हितांना दिसून येत आहे. नुकतेच केरळ येथे मंकीपॉक्सचा संशयास्पद रुग्ण आढळला आहे. देशात या रोगाबाबत चिंता आणि भीती असताना आता, संसर्गजन्य रोग तज्ञ आणि एचआयव्ही/एसटीडी (HIV/STD) सल्लागार डॉ ईश्वर गिलाडा यांनी या रोगावर भाष्य केले आहे. ते म्हणतात, ‘मंकीपॉक्स हा इतर लैंगिक संक्रमित संसर्गाप्रमाणेच आहे. मात्र डब्ल्यूएचओ (WHO) ही बाब घोषित करत नाही. कदाचित यामुळे सध्या संसर्ग झालेल्या लोकांविरुद्ध एक भेदभाव होण्याची शक्यता आहे.’

ते पुढे म्हणतात, ‘सध्या मंकीपॉक्सवर कोणताही परिपूर्ण उपचार नाही. स्मॉलपॉक्सची लस या रोगावर उपयुक्त ठरू शकते आणि मंकीपॉक्सच्या उपचारासाठी उपचारात्मक एजंट म्हणून काम करू शकते. याबाबत आपण कोणताही भेदभाव टाळून खबरदारी घेतली पाहिजे.’ गिलाडा यांनी पुढे सांगितले, ‘सध्या जवळजवळ 99% प्रकरणे ही पुरुषांच्या समलिंगी लैंगिक संबंधाशी निगडीत आहेत आणि जवळजवळ 80% प्रकरणे युरोप आणि नंतर अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि इतर देशातील आहेत. मंकीपॉक्स प्रामुख्याने जवळच्या किंवा अगदी जवळच्या व्यक्तीच्या संपर्कातून प्रसारित होतो.’

 

संबंधित पोस्ट

आपल्या घरात सर्वांत अधिक क्षारीय पदार्थ जर कोणता असेल तर तो म्हणजे दुधी भोपळा !!

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर – २४३ जणांची तपासणी

दिव्यांग बालकांच्या तपासणी शिबिरांचे आयोजन

ठाणे जिल्ह्यात कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून ४४९० नागरिकांची तपासणी; २३७ संशयित रुग्णांची नोंद…

मुंबई पाठोपाठ औरंगाबादेत गोवरची एण्ट्री, दोन बालकांना गोवरची लागणी; प्रशासनाकडून विशेष सुचना….

vishwatmaklokswamivarta

अतिसार नियंत्रणासाठी उपाययोजना राबवा