vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठवाडा दौऱ्यावर, 31 जुलैला देणार औरंगाबाद जिल्ह्यला भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठवाडा दौऱ्यावर, 31 जुलैला देणार औरंगाबाद जिल्ह्यला भेट…

मुंबई प्रतिनिधी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठवाडा दौरा करणार आहे. 31 जुलै रोजी मुख्यमंत्री औरंगाबाद जिल्ह्यास भेट देणार आहेत, अशी माहिती आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.

शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) नुकतीच शिवसंवाद यात्रा केली. या यात्रेत केंद्र स्थानी होता तो मराठवाडा. आदित्य ठाकरेंनी औरंगाबादसह पैठणमध्ये (Paithan) रॅली काढत शिवसैनिकांशी संवाद साधला. आदित्य यांच्या  शिवसंवाद यात्रेची राज्यभर चर्चा झाली. आता आदित्य ठाकरें पाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) देखील मराठवाडा दौरा करणार आहे. 31 जुलै रोजी मुख्यमंत्री औरंगाबाद जिल्ह्यास भेट देणार आहेत. अशी माहिती आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी दिली आहे. तरी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदेंचा हा पहिला दौरा असणार आहे. यापूर्वी मुख्यमंत्री शिंदेनी गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्याचा दौरा केला पण तो महापूराच्या पार्श्वभुमिवर. आता आढावा दौरा म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हा पहिलाचं दौरा असणार आहे

 

मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्या नंतर औरंगाबादचं(Aurangabad) नामांतर संभाजीनगर (Sambahji Nagar) करण्याचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) घेतला. त्यांचा या निर्णयावर विविध स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. पण नामांतरानंतर पहिल्यादाचं आता मुंख्यमंत्र्यांचा औरंगाबाद दौऱ्याला  विशेष महत्व आहे. दरम्यान फक्त औरंगाबाद शहरचं नाही तर संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्याचा दौरा मुख्यमंत्री करणार असल्याचं आमदार अब्दुल सत्तार यांनी सांगितलं. मराठवाडा शिवसेनेचा गड आहे तसेच महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) दोन मंत्री आपलं मंत्रीपद सोडून शिंदे गटात सामिल झाले आहे. म्हणून शिवसेना (Shiv Sena) आणि मराठवाडा (Marathwada) यांत विशेष समीकरण आहे.

संबंधित पोस्ट

चीनसह पाच देशातून येणाऱ्या प्रवाशांची होणार RT-PCR..केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया.

vishwatmaklokswamivarta

ऑपरेशन अभ्यास’ मॉक ड्रिल उद्या 13 मे रोजी नवी मुंबईतील ‘वाशी – सेक्टर 12’ मध्ये

सारा नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थी आत्महत्या घटनेची चौकशी सुरू- गृहराज्यमंत्री योगेश कदम

शेतकऱ्यांना दिलासा! विपणन हंगाम 2023-24 साठी सर्व रबी पिकांच्या किमान आधारभूत किंमतीना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

vishwatmaklokswamivarta

दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांना ‘समृद्धी’ कडून मिळणार उसाचा चौथा हप्ता,शंभर रुपये प्रती मेट्रिक टन प्रमाणे रक्कम थेट खात्यात होणार वर्ग  …

vishwatmaklokswamivarta

आजादी का अमृत महोत्सव हा साजरा करणाऱ्या उर्दू शाळेतील मुलांनी गायले वंदे मातरम! पहा हृदयस्पर्शी व्हिडिओ