vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्म

शिवालयातील प्रदक्षिणा ..

शिवालयातील प्रदक्षिणा …

जिथे शिवलिंगाची स्थापना केली आहे अशा शिवालयात संपूर्ण गोल प्रदक्षिणा घालायची नसते, हा असा नियम आहे. पण हे असं का ?

 

आपण शिवालयात गेलो. पिंडीला नमस्कार केला, अभिषेक घातला, कुठलं स्तोत्र पुटपुटलं, जी कुठली आपल्याला आराधना करायची होती ती केली. मग डाव्या हाताने परिक्रमा घालायला सुरुवात केली पण ही परिक्रमा अर्धीच घातली आणि आल्या मार्गाने तसेच परत फिरलो. शंकराच्या बहुतेक मंदिरांमध्ये लोकांनी पूर्ण गोल प्रदक्षिणा घालू नये म्हणून परिक्रमा मार्ग मध्येच बंद केलेला असतो.

 

शिवलिंगाची अर्धी परिक्रमा घालण्याचा धर्माचा आदेश आहे. आपला धर्म विनाकारण आदेश देत नाही त्यामागे काहीतरी कारण असतं आणि त्याही आधी आपलं म्हणजेच भक्ताचं हित त्यात सामावलेलं असतं. शिवलिंगावर अभिषेक घातला की तो अभिषेक जिथून बाहेर पडतो, त्याला निर्मली किंवा जलधारी किंवा सोमसूत्र असं म्हणतात. त्या सोमसूत्रात काय असतं ? तर तिथे ऊर्जा असते आणि ही ऊर्जा अतिशय गरम आणि शक्तिशाली असते.

 

शिवलिंग हे शिव आणि शक्ती यांचं प्रतिक आहे. त्या पिंडीला शाळुंकेने धरून ठेवलं आहे. शाळुंका म्हणजे शक्ती, जी अतिशय शक्तिशाली असते आणि जल, दूध किंवा ज्याने अभिषेक घातला आहे, तो अभिषेक जलधारीतून बाहेर पडताना ती ऊर्जा त्यात मिसळून जाते. ही ऊर्जा मानवाच्या शरीरासाठी चांगली नाही. आपण ते सोमसूत्र पायाने ओलांडलं की ही ऊर्जा आपल्या शरीरात प्रवेश करते आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर व मनावर होतो.

 

याचा एक श्लोक आहे –

”अर्द्ध सोमसूत्रांतमित्यर्थ: शिव प्रदक्षिणीकुर्वन सोमसूत्र न लंघयेत ।।

इति वाचनान्तरात।”

 

आता हा दोष कुठला आहे, जो सोमसूत्र ओलांडल्याने लागतो ! शरीरावर असा काय परिणाम होतो ?? सोमसूत्र ओलांडल्याने वीर्य निर्मितीवर प्रतिकूल परिणाम होतो. आपल्या शरीरातील पाच प्रकारच्या वायूंवरही याचा वाईट परिणाम होतो. आपण जांभई देतो, ही कृती देवदत्त वायुमुळे होते तसेच धनंजय वायू, हा वायू आपल्या संपूर्ण शरीरात इकडून तिकडे फिरत असतो, शरीराचे सगळे अवयव नीट काम करावेत या प्रयत्नात हा वायू असतो आणि मृत्युनंतरही हा वायू आपल्या शरीरात त्याचं अस्तित्व राखून असतो; या दोन वायूंच्या प्रवाहात सोमसूत्र ओलांडल्याने अडथळा निर्माण होतो. याचा परिणाम आपल्या शरीरावर आणि मनावरही होतो. म्हणून शिवलिंगाची संपूर्ण प्रदक्षिणा घालायची नाही आणि निर्मली आली की परत फिरायचं. हा नियम आहे.

 

पण, सोमसूत्रावर जर गवत, पानं, दगड, विटा, लाकूड असं काही ठेवून ती निर्मली झाकून ठेवली असेल तर सोमसूत्र ओलांडण्याचा दोष लागत नाही. पण तरीही ‘शिवस्यार्ध प्रदक्षिणा’ हे म्हटलेलं आहे म्हणजेच शिवाची प्रदक्षिणा ही नेहमी अर्धीच घालावी.

 

आज श्रावण सुरू झाला, आता शिवालयात गर्दी होईल. आपण शिवाच्या ज्या पिंडीचं म्हणजेच शिवलिंगाचं दर्शन घेत आहोत त्याचा अर्थ काय आणि या पिंडीला संपूर्ण प्रदक्षिणा घालायची नाही पण याचं कारण काय, हे सांगण्यासाठी हा दोन लेखांचा खटाटोप.

 

हर हर महादेव 🙏🏻🚩

 

©Manjusha Thatte Joglekar

संबंधित पोस्ट

अनंत श्री विभुषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज व प.पु.कानिफनाथ महाराज यांच्या कृपाआशिर्वादाने अंबड तालुक्यातील जामखेड येथे दिनांक 23 जानेवारी 2024 होणाऱ्या पादुका दर्शन सोहळ्यानिमित्त 🚩ध्वजारोहण(मंडप बांधणी)सोहळा🚩

vishwatmaklokswamivarta

🌞🌹आज चे पंचांग 🌹🌝

vishwatmaklokswamivarta

वीरशैव धर्म संस्थापक श्री श्री श्री 1008भगवत्पाद जगद्गुरु रेणुकाचार्य शिवाचार्य महास्वामी प्रगट दिन युगमानोत्सव प्रभावती नगरी येथे जल्लोषात साजरी*

-:♦ केळीचे झाड :————*    || केळीच्या झाडात देवाची वस्ती असते असे मानतात.  || केळीच्या झाडाला “रंभा” असेही म्हणतात.

vishwatmaklokswamivarta

विश्वबंधुत्वाचा भाव प्रदर्शीत करणारा महाराष्ट्राचा 59वा निरंकारी संत समागम भव्य रुपात संपन्न

vishwatmaklokswamivarta

🌹प्रभु प्रसाद🌹