
उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील घटना.. टॅटू गोंदवला आणि एचआयव्ही झाला,…
उत्तर प्रदेश प्रतिनिधीवाराणसी (Varanasi) येथील एखा घटनेने अवघे उत्तर प्रदेश आणि काही प्रमाणात देशातही खळबळ उडाली आहे. ही खळबळ उडण्याचे कारण असे की, 14 जणांनी आपल्या अंगावर टॅटू गोंदवला (Tattoo Design). त्यांची ही फॅशन (Fashion) त्यांना महागात पडली आहे. ज्यामुळे त्यांना एचआयव्ही (HIV) या विषाणूची लागण झाली आहे.
वाराणसी (Varanasi) येथील एखा घटनेने अवघे उत्तर प्रदेश आणि काही प्रमाणात देशातही खळबळ उडाली आहे. ही खळबळ उडण्याचे कारण असे की, 14 जणांनी आपल्या अंगावर टॅटू गोंदवला (Tattoo Design). त्यांची ही फॅशन (Fashion) त्यांना महागात पडली आहे. ज्यामुळे त्यांना एचआयव्ही (HIV) या विषाणूची लागण झाली आहे. होय, डॉक्टरांनी केलेल्या वैद्यकीय चाचणीमध्ये ही धक्कादायक बाब पुढे आली आहे. सांगितले जात आहे की, या 14 जणांनी एकाच ठिकाणाहून टॅटू गोदवून घेतला होता. ज्या व्यक्तीने त्यांना टॅटू गोंदवला त्याने निष्काळजीपणे एकच सूई सर्वांचे टॅटू काढताना वापरली होती. अँटी रेट्रो व्हायरल ट्रीटमेंट सेंटरच्या डॉक्टरांनी ही माहिती दिली.
अधिकच्या चौकशीत पुढे आले की, सर्वांनी एकाच ठिकाणी जाऊन टॅटू गोंदवले होते. हा टॅटू गोंदवताना कोणत्याही प्रकारे काळजी घेण्यात आली नव्हती. सूईसुद्धा बदलण्यात आली नव्हती. परिणामी एकाच वेळी सर्वांना ही लागण झाली.



