vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलीने डॉक्टरांना मारली थप्पड; टीका झाल्यानंतर वडिलांनी मागितली जाहीर माफी …

मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलीने डॉक्टरांना मारली थप्पड; टीका झाल्यानंतर वडिलांनी मागितली जाहीर माफी…

 

मिझोराम प्रतिनिधी

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबीयांवर सोशल मीडियावर जोरदार टीका झाली.

मिझोरमचे मुख्यमंत्री झोरमथंगा यांच्या मुलीने डॉक्टरला मारहाण केल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता खुद्द मुख्यमंत्री झोरमथांगा यांनी जाहीर माफी मागितली आहे. राजधानी आयझॉलमधील एका क्लिनिकच्या त्वचारोगतज्ज्ञ डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांची मुलगी मिलारी छांगटे यांना आधी वेळ घेतल्याशिवाय भेटण्यास नकार दिला होता. डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांच्या मुलीला क्लिनिकमध्ये भेटायला येण्याआधी वेळ घेण्यास सांगितले. याच रागातून तिने डॉक्टरांना मारहाण केल्याचे समजते.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबीयांवर सोशल मीडियावर जोरदार टीका झाली. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) मिझोराम युनिटने या घटनेचा विरोध केला. त्याचवेळी डॉक्टरांनी काम करताना काळे बिल्ला लावले. यानंतर मुख्यमंत्री झोरमथांगा यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून जाहीर माफी मागितली.

 

संबंधित पोस्ट

विभागीय युवा महोत्सवाकरीता रायगड जिल्हयाचा संघ जाहीर

vishwatmaklokswamivarta

अयोध्येत महाराष्ट्र सदनसाठी जागा मागणार – आदित्य ठाकरे युवा सेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री

अक्कलकोट बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचे ५५ टक्के काम पूर्ण- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

रेल्वेच्या विकास जालन्याचा विकास–भास्कर आंबेकर.

vishwatmaklokswamivarta

माजी सैनिक व विधवांच्या पाल्यांसाठी प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजना

vishwatmaklokswamivarta

राज्यातील विद्यार्थ्यांना गणवेश वितरणात झालेल्या विलंबाची चौकशी- शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर