
एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांची घोषणाबाजी, आदित्य ठाकरे यांची खोचक प्रतिक्रिया….
मुंबई प्रतिनिधी
एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी विरोधकांविरोधात विधानसभेबाहेर आज जोरदार घोषणाबाजी केली. शिंदे गटांच्या आमदाराचे लक्ष्य हे आदित्य ठाकरे होते. आदित्य ठाकरे यांच्या विरोधता फलक झळकावत जोरदार घोषणाबाजी या आमदारांनी केली. दरम्यान, सत्ताधारी आमदारांच्या या कृतीबद्दल आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यविधिमंडळ अधिवेशनाच आज शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवशी सत्ताधारी आमदार आज विरोधकांविरोधात आक्रमक झालेले दिसले. आजवर विरोधक सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक होतात. पण, सत्ताधारीच विरोधकांविरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज सत्ताधारी एकनाथ शिंदे गटातील (Eknath Shinde Group) आमदारांनी विरोधकांविरोधात विधानसभेबाहेर आज जोरदार घोषणाबाजी केली. शिंदे गटांच्या आमदाराचे लक्ष्य हे आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) होते. आदित्य ठाकरे यांच्या विरोधता फलक झळकावत जोरदार घोषणाबाजी या आमदारांनी केली. दरम्यान, सत्ताधारी आमदारांच्या या कृतीबद्दल आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे
एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदरांनी अनेकदा स्पष्ट केले होते की, काही झाले तरी आम्ही मतोश्री आणि ठाकरे कुटुंबीयांबद्दल बोलणार नाही. मात्र, पाठिमागील दोन दिवस पाहता शिंदे गटातील आमदार आदित्य ठाकरे आणि मातोश्रीबद्दल जाहीर भूमिका घेताना दिसत आहेत. एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी आज आदित्य ठाकरे यांच्यावर वैयक्तीक टीका केल्याचे पाहायला मिळाले. ”पुन्हा निवडणूक लढवण्याची देतात ठसन, स्वत: आमदार व्हायला महापौर आणि दोन MLC चे लागते कुशन”, ”खुर्चीवर बसल्यावर शिवसैनिकाला केले तडीपार, सत्ता गेल्यावर फिरतात दारोदार”, ”युवराजांची ‘दिशा’ नेहमीच चुकली” अशा घोषणा त्यांनी दिल्या. या सर्व प्रकारामुळे आगामी काळात संघर्ष अधिक वाढेल अशी चिन्हे आहेत



