vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महाविकास आघाडीनं आज (शनिवारी) मुंबईत हल्लाबोल मोर्चाची हाक दिली आहे. महापुरूषांच्या अवमानाप्रकरणी आज महाविकास आघाडीनं या मोर्चाची हाक दिली ज्यामध्ये शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे पदाधिकारी आणि नेते सहभागी होणार आहेत. 

महाविकास आघाडीनं आज (शनिवारी) मुंबईत हल्लाबोल मोर्चाची हाक दिली आहे. महापुरूषांच्या अवमानाप्रकरणी आज महाविकास आघाडीनं या मोर्चाची हाक दिली ज्यामध्ये शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे पदाधिकारी आणि नेते सहभागी होणार आहेत.

[ मुंबई प्रतिनिधी: राज्यामध्ये सत्तांतरानंतर राजकीय नाट्याचे विविध अंक पाहायला मिळाले. त्यातलाच आणखी एक अंक आज पार पडणार आहे. अर्थात महाविकास आघाडीनं आज (शनिवारी) मुंबईत हल्लाबोल मोर्चाची हाक दिली आहे. महापुरूषांच्या अवमानाप्रकरणी आज महाविकास आघाडीनं या मोर्चाची हाक दिली ज्यामध्ये शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे पदाधिकारी आणि नेते सहभागी होणार आहेत. या मोर्चाची आणखीही काही कारणं आहेत जाणून घ्या ती कारणं नेमकी कोणती….

– छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या आणि अशा अनेक महामानवांचा अपमान करणाऱ्यांना धडा शिकवणं.

– मिंध्या सरकारला वठणीवर आणत महाराष्ट्राची अस्मिता आणि स्वाभिमान जपण्यासाठी.

– राज्यातील कष्टकऱ्यांचे आणि नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी. आरक्षण, संरक्षण आणि इतर सुविधांचे प्रश्न प्रकाशात आणण्यासाठी.

 

– संकटांच्या कचाट्यात सापडलेल्या बळीराजाचे प्रश्न निकाली काढून त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी.

वरील कारणांव्यतिरिक्त इतरही काही कारणांच्या पार्श्वभूमीवर या बंदची हाक देण्यात आली आहे. यामध्ये जनतेचा आवाज उठवत त्यांना हुकूमशाहीविरोधात आवाज उठवण्यासाठी एकवटणं हासुद्धा या मोर्चाचा हेतू आहे. यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असेल. तो म्हणजे महाराष्ट्रातील अनेक मोठे उद्योग परराज्यात नेणाऱ्यांना जाब विचारणं. राज्यातील तरुणांच्या रोजगाराचा प्रश्नही या मोर्चातून सत्ताधाऱ्यांना विचारला जाणार आहे.

 

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वाहतुक मार्गांमध्ये बदल

मविआच्या महामोर्चासाठी मार्गात बदल करण्यात आले आहेत, या धर्तीवर रिचर्डसन्स क्रुडास मिल, सर जे.जे. उड्डाणपूल डॉ. दादाभाई नौरोजी रोड, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे रस्ते बंद असेतील. तर, भायखळ्यातून दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या वाटेतही बदल करण्यात आले आहेत. भायखळा, लालबागमधूनही दक्षिण मुंबईकडे येणाऱ्या मार्गात बदल करण्यात आला आहे.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष: शिवसेना 16 आमदार अपात्रतेची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सलग चौथ्यांदा लांबणीवर…

इंदोर बस अपघातात प्राण गमावलेल्यांसोबत माझ्या संवेदना, मदत व बचाव कार्य सुरु आहे- पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबई महानगर क्षेत्रात ‘पॉड टॅक्सी’साठी महापालिकांनी आराखडा तयार करा- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’ला प्राधान्य देण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन.

vishwatmaklokswamivarta

मुंबई महानगरपालिकेची जाहीर सूचना- मुंबई शहर व उपनगर तसेच ठाणे व भिवंडीला होणाऱ्या पाणी पुरवठ्यात १०% कपात…

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांनी जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील माता-भगीनींना दिल्या शुभेच्छा

vishwatmaklokswamivarta

मुंबईवरील  26/11 दहशतवादी हल्ल्याला 15 वर्षे पूर्ण शहिदांना मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाच्या आवारात राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून श्रद्धांजली अर्पण

vishwatmaklokswamivarta