
सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करा; आमदार नितेश राणे यांची मागणी….
नागपूर प्रतिनिधी
आगामी काळात आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढू शकतात. दिशा सालियन आणि सुशांत सिंग मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट व्हायला हवी, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.
दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत ची माजी व्यवस्थापक दिशा सालियन मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा उघड होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आज नागपूर विधानसभेत पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे हे प्रकरण पुन्हा उघडण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले. अशा परिस्थितीत आगामी काळात आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढू शकतात. दिशा सालियन आणि सुशांत सिंग मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंची (Aaditya Thackeray) नार्को टेस्ट व्हायला हवी, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे
अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करावी आमदार @meNeeleshNRane यांची मागणी. @DDNewslive @DDNewsHindi



