vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

पाकिस्तानात ट्रेनमध्ये स्फोट; प्रवाशांची धावपळ अनेक लोक जखमी असल्याची सूत्रांची माहिती

 पाकिस्तानात ट्रेनमध्ये स्फोट; प्रवाशांची धावपळ अनेक लोक जखमी असल्याची सूत्रांची माहिती

[ ए एन आय प्रतिनिधी

पाकिस्तानात ट्रेनमध्ये सिलेंडर फुटल्याने दोनजण ठार झाले असून चौघे जखमी झाले आहेत. गुरुवारी दुपारी क्वेट्टाला  निघालेल्या जाफर एक्स्प्रेसमध्ये हा स्फोट झाला. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेन रेल्वे स्थानकातून जात असताना हा स्फोट झाला. स्थानिक प्रसारमाध्यमांनुसार, ही ट्रेन पेशावर  येथून आली होती. स्फोटानंतर (Blast) ट्रेनमध्ये प्रवाशांची एकच धावपळ सुरु झाली होती.

 

ट्रेनच्या बोगी नंबर 4 मध्ये हा स्फोट झाल्याचा माहिती स्थानिक प्रसारमाध्यमांनी रेल्वे प्रवक्त्यांच्या हवाल्याने दिली आहे. प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशी सिलेंडर वॉशरुमजवळ घेऊन गेला होता. याच सिलेंडरचा स्फोट झाला. दरम्यान, स्फोटाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि रेल्वे ट्रॅक बंद करुन टाकला.

 

स्थानिक प्रसारमाध्यमांनुसार, पोलीस आणि दहशतवादी विरोधी पथकाचे अधिकारी घटनास्थळावरुन पुरावे गोळा करत आहेत. पेशावरमध्ये मशिदीत झालेल्या स्फोटाच्या काही दिवसांनी हा स्फोट झाला आहे. पेशावरमध्ये मशिदीत लोक प्रार्थनेसाठी जमले असताना झालेल्या स्फोटात 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.

 

30 जानेवारीला हा स्फोट झाला होता. आत्मघाती हल्लेखोर पोलिसाच्या वेषात कडक सुरक्षाव्यवस्था भेदत दुचाकीवरुन मशिदीत गेला होता.

संबंधित पोस्ट

बांगलादेशात 1,400 लोक मारले गेले, मोहम्मद युनूस सरकारमध्ये हिंदूंना लक्ष्य करण्यात आले, संयुक्त राष्ट्राचा अहवाल भयावह .

vishwatmaklokswamivarta

महत्त्वाची सूचना* मध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या संबंधित दूतावासांनी तेथे वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांसाठी सुरक्षा ॲडव्हायझरी जारी .

युरोपियन संसदेने रशियाला ‘दहशतवादाचे राज्य प्रायोजक’ म्हणून घोषित केले- Reports

vishwatmaklokswamivarta

तैवानमध्ये 6.9 तीव्रतेचा भूकंप तर पुढील काही तासांत त्सुनामीचा धोका

vishwatmaklokswamivarta

पाकिस्तानातील पंजाब विद्यापीठात होळी साजरी करणाऱ्या हिंदू विद्यार्थ्यांवर हल्ला, 15 जखमी..

सलमान रश्दी यांच्या प्रकृतीत सुधारणा, व्हेंटिलेटर हटवला; हल्लेखोर हा दी मतार ला पश्चाताप नाही