vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबई पोलिसांची मुंबईत अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी महिलांविरुध्द धडक कारवाई..

 मुंबई पोलिसांची मुंबईत अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी महिलांविरुध्द धडक कारवाई…

 

मुंबई प्रतिनिधी

मुंबई पोलिसांनी बांगलादेशी महिलांविरोधात  धडक कारवाई सुरु केलीये. मुंबईत अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात मुंबई पोलिसांनी मोहीम उघडली आहे.

मुंबई पोलिसांनी मागील सहा महिन्यात पश्चिम उपनगरातील मालाड मालवणी, बोरिवली दहिसर गणपत पाटील नगर यांसारख्या परिसरातून दहापेक्षा अधिक बांगलादेशी नागरिकांची धरपकड केली आहे. अशाच पद्धतीनं अवैधरित्या मुंबईच्या दहिसर परिसरात राहणाऱ्या दोन बांगलादेशी महिलांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष 12 ने अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्या दोन्हीही बांगलादेशी महिला फेब्रुवारी 2023 पासून मुंबईच्या दहिसर परिसरात राहत आहेत. अटक करण्यात आलेल्या महिलांचं वय वीस व असून 29 वर्ष असं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दहिसर परिसरात दोन बांगलादेशी महिला फेब्रुवारी 2023 पासून अवैधरित्या वास्तव्य करत असल्याची माहिती गुप्त बातमीदाराद्वारे सपोनि रासकर यांना मिळाली.

माहितीवरून दोन्ही महिलांच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून त्यांचा पत्ता शोधून काढला. मिळालेल्या पत्त्यावरून त्या दोन्हीही महिलांचा शोध घेतला. त्या दोन्ही महिलांची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडं भारतीय नागरिकत्व सिद्ध करणारे कोणतेही अधिकृत कागदपत्र उपलब्ध नव्हतं. त्यांच्या फोनमधील नंबर तपासून पाहिले असता त्यांचं संभाषण नेहमी बांगलादेशमधील त्यांच्या नातेवाईकांसोबत होत असल्याचं निष्पन्न झाल्यानं त्या दोघीही बांगलादेशी असल्याची खात्री पटली, म्हणून त्या दोघींनाही गुन्हे शाखा कक्ष बाराच्या टीमनं ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली.

प्रभारी पोलीस निरीक्षक विलास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर, सपोनि विजय रासकर, कारंडे, लक्ष्मण बागवे, कल्पेश सावंत, बालकृष्ण लिम्हण, विनोद अहिरे, संतोष बने, शैलेश बिचकर, अमोल राणे, विशाल गोमे, प्रसाद गोरुले, शैलेश सोनावणे, चंद्रकांत शिरसाट,आण्णा मोरे या तपास पथकानं ही यशस्वी कारवाई केली.

संबंधित पोस्ट

पालघर जिल्ह्यामध्ये कृषी महाविद्यालय व मत्स्य विद्यालय स्थापन-करण्याबाबत शासन सकारात्मक- कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

गोरेगाव मतदारसंघातील *मोतीलाल नगर क्रमांक १,२ व ३* च्या पुनर्विकासाबाबत*आमदार व माजी राज्यमंत्री विद्या ठाकुर* यांच्या मार्गदर्शनाखाली रहिवाशांसोबत चर्चा सत्राचे आयोजन

राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना; ३१ जुलै पर्यंत अर्ज मागविले

vishwatmaklokswamivarta

कुष्ठरोग निर्मूलन जनजागृती मॅरेथॉन स्पर्धेत २०० धावपटूंचा सहभाग

vishwatmaklokswamivarta

संभाजी नगर प्रभाग क्रं.1 मधील रोडचे काम न करता कॉन्ट्रक्टरने उचले बिल-जिल्हाधिकारीकडे चौकशीची मागणी – डॉ.रामकृष्ण भोडोंने

दिव्यांग विद्यार्थ्यांचे कला गुण विकसित करण्यासाठी प्रयत्न करावेत जिल्हाधिकारी राजा दया निधी

vishwatmaklokswamivarta