vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

महापालिकेच्या ‘एफ उत्तर’ विभागातील पाण्याची समस्या तातडीने सोडवावी- पालकमंत्री दीपक केसरकर

महापालिकेच्या ‘एफ उत्तर’ विभागातील पाण्याची समस्या तातडीने सोडवावी- पालकमंत्री दीपक केसरकर

 

‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात ‘एफ उत्तर’ विभागातील नागरिकांशी साधला संवाद

मुंबई, प्रतिनिधी : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एफ उत्तर’ विभागात स्वच्छ पिण्याच्या पाण्याची समस्या असल्याची नागरिकांची तक्रार आहे. ही समस्या सोडविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले. मुंबई शहरात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर असलेली उंदरांची समस्या सोडविण्यासाठी महानगरपालिकेने तसेच ड्रग्स सेवन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस विभागाने मोहीम राबवावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

 

पालकमंत्री श्री. केसरकर हे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक विभागात जाऊन ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत. या अंतर्गत बुधवारी त्यांनी ‘एफ उत्तर’ विभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. ज्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करणे शक्य आहे त्या सोडविण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. खासदार राहुल शेवाळे, आमदार सर्वश्री कालिदास कोळंबकर, तमिल सेलवन, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त रमाकांत बिरादार, जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व संबंधित शासकीय विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका, पोलीस विभाग आदींचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

 

या सुसंवाद कार्यक्रमात विभागातील रहिवाशांनी मांडलेल्या समस्यांमध्ये प्रामुख्याने कमी दाबाने पाणी येणे, परिसराची स्वच्छता, नालेसफाई, वाहतुकीची समस्या सोडविणे, अतिक्रमणे काढणे, ई – सेवा केंद्र सुरू करणे, झोपडपट्टी पुनर्विकासाच्या समस्या आदींचा समावेश होता.

 

मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, मुंबई ड्रग्स मुक्त करणे, भिकारीमुक्त करणे, फुटपाथ वरील लोकांचे रेकॉर्ड तयार करून त्यांची स्वतंत्र सोय करणे आणि त्यानंतर फुटपाथवर लोकांची संख्या वाढणार नाही याची दक्षता घेणे, २०११ नंतरच्या झोपड्या वाढणार नाहीत याची दक्षता घेणे, वाहतूक नियमनासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणे, कचरा करणाऱ्यांना दंड करून शहर स्वच्छ राखणे, शहरात पावसाचे पाणी साचू नये यासाठी पंपांची देखभाल दुरूस्ती करून आवश्यकता भासल्यास अतिरिक्त पंपांची

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दशकपूर्तीनिमित्त उद्या मुंबईत सोहळा

गरुजु मुलांच्या स्वप्नांना जिजाऊने दिला आधार जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेने ठाण्यात सुरु केल्या 21 मोफत अभ्यासिका..

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी, व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल, इन्स्टाग्राम लाईव्हवर शिवीगाळ गुन्हा दाखल आरोपीचा शोध सुरू

vishwatmaklokswamivarta

23 व्या ‘प्रॉपर्टी एक्स्पो 2025’ मध्ये नवी मुंबई महानगरपालिका नगररचना विभागाचा माहितीपूर्ण स्टॉल

vishwatmaklokswamivarta

भारतातील प्रवास सेवा अधिक आधुनिक आणि सुरक्षित करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने ई-पासपोर्टची सुविधा सुरू

vishwatmaklokswamivarta

इमाव, विजाभज, विमाप्र प्रवर्गांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेचे प्रस्ताव इमाव कल्याण विभागाकडे मागविले

vishwatmaklokswamivarta