vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

अकरा पत्रकार संघटनांनी घेतली,राज्यपाल रमेश बैस यांची भेट*आमदार किशोर पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी*

अकरा पत्रकार संघटनांनी घेतली राज्यपाल रमेश बैस यांची भेट आमदार किशोर पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी…

मुंबई : प्रतिनिधी

पाचोरा येथील सत्ताधारी पक्षाचे आमदार किशोर पाटील यांच्या विरोधात पत्रकार संरक्षण कायदयाच्या कलमानुसार गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी आज मुंबईतील अकरा पत्रकार संघटनांच्या प्रतिनिधींनी राज्यपाल श्री. रमेश बैस यांची भेट घेऊन केली . या विषयात लक्ष घालण्याचे आश्वासन राज्यपालांनी शिष्टमंडळास दिले..

पाचोरा येथील आमदार किशोर पाटील यांनी स्थानिक पत्रकार संदीप महाजन यांना अर्वाच्च शब्दात शिविगाळ करून दुसरया दिवशी गुंडाकरवी मारहाण केली याची संतप्त प्रतिक्रिया महाराष्ट्रभर उमटली. ठिकठिकाणी त्यांचा निषेध झाला.. आज मुंबईतील प्रमुख अकरा पत्रकार संघटनांची बैठक मुंबई मराठी पत्रकार संघात झाली. त्यानंतर सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी राज्यपाल श्री. रमेश बैस यांची भेट घेऊन किशोर पाटील यांच्यावर कारवाई करून संदीप महाजन यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली.. यावर या विषयात जातीने लक्ष घालण्याचे आश्वासन राज्यपाल महोदयांनी दिले.

यावेळी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, टीव्ही जर्नलिस्ट असोशिएशन, मुंबई मराठी पत्रकार संघ, मुंबई प्रेस क्लब, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, बीयूजे, क्राईम रिपोर्टर असोशिएशन, पोलिटिकल फोटो जर्नलिस्ट असोशिएशन, म्हाडा पत्रकार संघ, मुंबई महापालिका पत्रकार संघ आदि संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते…

संबंधित पोस्ट

पुर परिस्थितीबाबत ठाणे जिल्ह्यात अंमलबजावणीसाठी व्यापक उपाययोजना राबविण्यात येत आहेत,मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनानुसार प्रशासन सतर्क

कांजूरमार्ग गाव येथे राहणारे पत्रकार वितरक मयत महेंद्र पांचाळ यांच्या नातेवाईक आप्तेष्टांचा शोध आणि माहिती करिता आवाहन

vishwatmaklokswamivarta

महिला सक्षमीकरण आणि बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठीअधिक गतीने कार्य करणार- महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे

vishwatmaklokswamivarta

बॉम्बे आर्ट गॅलरीमध्ये सोलो चित्रप्रदर्शन भरणार

vishwatmaklokswamivarta

देशव्यापी सायबर सुरक्षा जनजागृती अभियानाचा25 सप्टेंबरपासून शुभारंभ  नागरिकांसाठी महिनाभर देशव्यापी सायबर सुरक्षा व गोपनीयता जनजागृती अभियान· नागरिकांना सायबर सुरक्षा व गोपनीयतेच्या सर्वोत्तम पद्धतींबद्दल मार्गदर्शन होणार

vishwatmaklokswamivarta

महागाई विरोधात डाव्या पक्ष्यांनी पुकारले देशव्यापी आंदोलन…