vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हेप्रदेश

मणिपूरच्या जातीय संघर्ष : बिष्णुपूर जिल्ह्यात सामूहिक बलात्कार आणि विनयभंग या कलमांखाली शून्य एफआयआर नोंदवण्यात आली आहे

 मणिपूरच्या जातीय संघर्ष : बिष्णुपूर जिल्ह्यात सामूहिक बलात्कार आणि विनयभंग या कलमांखाली शून्य एफआयआर नोंदवण्यात आली आहे

राज्य प्रतिनिधी

दोन महिलांची नग्न धिंड काढल्याचा निंदनीय प्रकार चर्चेत असताना आता मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यात सामूहिक बलात्कार आणि विनयभंग या कलमांखाली शून्य एफआयआर नोंदवण्यात आली आहे. चुराचंदपूर येथील वयाच्या तिशीतील महिलेने कुकी समुदायातील जमावाने हल्ला केल्याची तक्रार केली होती ज्याआधारे आता एफआयआर नोंदवण्यात आलेली आहे. बिष्णुपूर पोलिसांनी सांगितले की, शून्य एफआयआर चुराचंदपूरमधील संबंधित पोलिस स्टेशनला पाठवण्यात आली आहे. पीडितेने स्वतः तक्रार दाखल केली होती परंतु एफआयआरमध्ये वेगळ्या नावाने तक्रार दाखल केलेली आहे.

तक्रारीनुसार, मणिपूरमध्ये ज्या दिवशी जातीय संघर्ष सुरू झाला (३ मे) तेव्हाच संध्याकाळी ६.३० च्या सुमारास कुकी समुदायातील जमावाने पीडितेच्या घराला आग लावली होती. त्यावेळी घाबरून पीडितेने स्वतःची दोन मुलं, वहिनी आणि भाचीसह घरातून पळ काढला. मात्र, ती धावत असताना पडली आणि तिने आपल्या वहिनीला मुलांसह पुढे जाण्यास सांगितले. जेव्हा ती महिला उठली तेव्हा ५ ते ६ जणांच्या गटाने तिला पकडून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. नंतर त्यांच्यामध्ये कुकी समुदायातील अन्यही लोक सामील झाले होते, तक्रारीत नमूद केले आहे की, जेव्हा पीडितेला शुद्ध आली तेव्हा ती मैतई समुदायातील एका घरात होती

दरम्यान ही घटना ३ मे रोजी घडूनही पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी दोन महिने का घेतले यावरही महिलेने स्पष्टीकरण दिले आहे. “अत्याचार झाल्याचे उघडपणे सांगणे हे समाजात ‘कलंक’ म्हणून पाहिले जाते तेव्हा समाज आपल्यावर बहिष्कार घालेल अशी भीती असल्याने, स्वतःची आणि माझ्या कुटुंबाची इज्जत वाचवण्यासाठी मी आधी काही सांगितलं नाही. माझ्यावर झालेल्या अत्याचाराने मला किती आघात आणि त्रास सहन करावा लागला हे मला जाणवू लागल्यापासून मी पुढे येण्याचे ठरवले आहे.” असे पीडिता म्हणाली. तर माझा कोणताही दोष नसताना माझ्यावर अत्यंत भयंकर प्राणघातक हल्ला करणाऱ्या दोषींना पुरेशी शिक्षा झाली पाहिजे” अशी अपेक्षा तक्रारदार पीडितेने व्यक्त केली आहे.

संबंधित पोस्ट

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा 17 फेब्रुवारीला

vishwatmaklokswamivarta

भारतीय सैन्य दलातील अधिकारी पदासाठी मोफत पूर्व प्रशिक्षण

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी जिल्ह्यात ६९.९१ टक्के मतदान*

vishwatmaklokswamivarta

बेस्ट ब्युटीशियन पुरस्कार वितरण साहळा उत्साहात; 23 रक्तदात्यांनी केलं रक्तदान

सावकारी कर्जापोटी संपादित केलेली62 हे. 16 आर इतकी स्थावर मालमत्ता परत परवानाधारक सावकाराकडून कर्ज घेण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

जागतिक सुरक्षित इंटरनेट दिवस जिल्ह्यात उत्साहात साजरा

vishwatmaklokswamivarta