vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राज्याच्या पहिल्या मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदी राम नाईक…

राज्याच्या पहिल्या मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदी राम नाईक…

 

मुंबई, प्रतिनिधी: भूजलाशयीन आणि सागरी जिल्ह्यांत मत्स्योद्योग विकास धोरण निश्चित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीत आता अंशतः बदल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांची समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 

राज्याच्या इतिहासात प्रथमच मत्स्य व्यवसाय विकास धोरण होत असून मत्स्य व्यवसायाचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने ते साह्यभूत ठरणार आहे.

 

या समितीत सागरी जिल्ह्यांतील तसेच भूजलाशयीन प्रत्येकी दोन विधानसभा सदस्य व एक विधानपरिषद सदस्यांच्या नावांचा समिती सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या विभागाची सूत्रे स्वीकारतानाच स्वतंत्र धोरण तयार करण्याची घोषणा केली होती.

 

समिती गठित करण्यासंदर्भात शासन निर्णय २४ ऑगस्ट, २०२३ रोजी निर्गमित केला असून आयुक्त (मत्स्यव्यवसाय) यांच्या ऐवजी आता श्री राम नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती कार्य करेल. या समितीत महेश बालदी (विधानसभा सदस्य), मनीषा चौधरी (विधानसभा सदस्य), आशिष जयस्वाल ( विधानसभा सदस्य), पंकज भोयर (विधानसभा सदस्य), रमेश पाटील (विधान परिषद सदस्य), प्रवीण दटके (विधान परिषद सदस्य), आयुक्त मत्स्यव्यवसाय, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळ, मुंबई, उप सचिव (मत्स्यव्यवसाय), मंत्रालय, मुंबई, सहआयुक्त मत्स्यव्यवसाय (भूजल), सहआयुक्त मत्स्यव्यवसाय (निमखारे), वैज्ञानिक, केंद्रीय मत्स्यकी अनुसंधान संस्था (CIFE), मुंबई, सागरी जिल्ह्यांतील सहकारी मच्छिमार संस्थांचे १ प्रतिनिधी, भूजल जिल्ह्यांतील सहकारी मच्छिमार संस्थांचे १ प्रतिनिधी, केंद्रीय समुद्री मत्स्यिकी अनुसंधान संस्था (CMFRI), मुंबई यांचे प्रतिनिधी, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांचे प्रतिनिधी, मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील सेवाभावी संस्थांचे (NGO) २ प्रतिनिधी आदींचा समावेश आहे. सह आयुक्त मत्स्यव्यवसाय (सागरी) हे समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.

 

विविध राज्यांतील योजनांचे अध्ययन करुन योजनांचे प्रारुप तयार करणे. (खारे, निमखारे व गोडे पाणी), जिल्हास्तरीय / राज्यस्तरीय योजनांचे अध्ययन करून मत्स्य विकासाबाबत स्वतंत्र योजना तयार करणे, सद्य:स्थितीतील अस्तित्वातील नियमात कालानुरूप आवश्यक बदल सुचविणे, मत्स्य विकासाच्या अनुषंगाने पर्यावरण संतुलन राखणे व त्यावर उपाययोजना सुचविणे, दुर्मिळ मत्स्य प्रजातींबद्दल संवर्धन व संरक्षण करणे, पारंपारिक मासेमारी आणि त्यावर अवलंबून असलेले मच्छिमारांच्या उपजीविकेबद्दल साधनांची उपाययोजना सुचविणे, सार्वजनिक / खासगी भागीदारीतून जेट्टी, बंदरे यांचा विकास करणे, मत्स्यव्यवसाय विषयक शैक्षणिक अभ्यासक्रम, औपचारिक अभ्यासक्रम सुचविणे तसेच प्रशिक्षण देणाऱ्या केंद्रांचा विकास करणे, मासेमारी व्यावसायिकांना या क्षेत्रात उत्पादन वाढीसाठी तसेच मार्गदर्शनासाठी हेल्पलाईन सेवा सुरू करणे, मासेमारी व्यवसायाकरिता शीतगृह वाहतूक साखळी, मच्छिमार व त्यांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी व सामाजिक सुरक्षेसाठी उपाययोजना सुचविणे, “

संबंधित पोस्ट

छत्रपती शिवाजी महाराजांना शिवतीर्थावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिवादन*

vishwatmaklokswamivarta

ऑपरेशन प्रहारः अवैध मद्यविक्री प्रकरणी १२२ ढाबाचालक दोषी, लोकअदालतीत २६ खटल्यात ८ लाखांचा दंड वसूल…

vishwatmaklokswamivarta

सामाजिक न्याय विभागाच्या योजना गाव-खेड्यातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचवा- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले• सामाजिक न्याय विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा..

जगातील सर्वात मोठा १६ हजार मेगावॅटचा विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्प;शेतकऱ्यांसाठी दिवसावीज पुरवठ्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ..

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता 14 जुलैपासून विद्यार्थी सहाय्य जनजागृती अभियान 

महाराष्ट्रात खळबळ जनक दर्शना पवार हत्याकांड आधी कंपासमधीस कटरनं हत्या आरोपीचा कबूलनामा …

vishwatmaklokswamivarta