vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

शहीद जवान शंकर उकलीकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी उकलीकर कुटुंबियांचे सांत्वन केले.

शहीद जवान शंकर उकलीकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी उकलीकर कुटुंबियांचे सांत्वन केले.

 

राज्य प्रतिनिधीकराड तालुक्यातील किल्ले वसंतगड गावचे सुपुत्र जवान शंकर बसाप्पा उकलीकर यांना लेह येथे देशकर्तव्य बजावत असताना झालेल्या दुर्घटनेत हौतात्म्य प्राप्त झाले. ते सैन्य दलात इंजिनिअर रेजिमेंटमध्ये नायब सुभेदार पदावर कार्यरत होते.

 

आज पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन उकलीकर कुटुंबियांचे सांत्वन केले. शहीद जवान शंकर उकलीकर यांनी २२ वर्षे देशरक्षणाचे कर्तव्य बजावले. गावातील सामाजिक कार्यातही ते सहभागी असत. त्यांचे हौतात्म्य कायम स्मरणात राहील, तसेच उकलीकर कुटुंबियांच्या पाठीशी आम्ही सदैव आहोत, असे मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी याप्रसंगी आश्वस्त केले. यावेळी शहीद जवान शंकर उकलीकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी श्रद्धांजली वाहिली.

 

यासमयी उकलीकर कुटुंबीय, स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

जात वैधता प्रमाणपत्रासाठी 26 जूनपासून विशेष मोहीम

उत्तराखंड येथील: जोशीमठ ‘सिंकिंग झोन’ म्हणून घोषीत, खचणारी जमीन आणि भेगाळलेल्या भींती

नोंदणीकृत माथाडी बांधकाम कामगारांना सुरक्षा संच व गृहोपयोगी साहित्य वाटप करण्याची सय्यद अशफाक अली यांची मागणी

जालन्याची चिमुकली सिया दांदडे**ठरली जागतिक कीर्तीची क्रिएटर!* =इन्फ्लुएंसर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नावाची नोंद…

vishwatmaklokswamivarta

मणिपूर राज्यात हिंसाचाराचा आगडोंब, कर्फ्यूमध्ये अंशत: शिथिलता…

पनवेल येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना उमेदवार निवड मेळाव्याचे आयोजन