vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी 25 ऑक्टोबरला पेंशन अदालतीचे आयोजन

जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी 25 ऑक्टोबरला पेंशन अदालतीचे आयोजन

 

 

 

          राज्य प्रतिनिधी :- जिल्हा परिषदेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या तक्रारी निकाली काढण्यासाठी बुधवार दि. 25 ऑक्टोबर 2023 रोजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) जिल्हा परिषद जालना यांच्या दालनात पेंशन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

 

पेंशन अदालतीमध्ये विभाग निहाय नियोजन करण्यात आले आहे. शिक्षण (प्राथमिक) विभाग, कृषी विभाग, आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण विभागाचे आयोजन दुपारी 2 ते 2:30 वाजेपर्यंत तर सामान्य प्रशासन विभाग, वित्त विभाग, पंचायत विभाग, सिंचन विभागासाठी दुपारी 2:30 ते 3:00 वाजेपर्यंत वेळ असणार आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, बांधकाम विभाग, पशुसंवर्धन विभाग, समाजकल्याण विभागासाठी दुपारी 3 ते 3:30 वाजेपर्यंतच्या वेळेत पेंशन अदालतीस उपस्थित रहावे. पेंशन अदालतीसाठी प्रलंबित प्रश्न, अर्ज, पोस्टाने, ई-मेलद्वारे किंवा हस्तपोच सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद जालना या ठिकाणी दि.23 ऑक्टोबर 2023 पर्यंत सादर करावेत. ऐनवेळी आलेल्या अर्जाचा अथवा तक्रारीचा या अदालतीमध्ये समावेश करण्यात येणार नाही. असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य), जिल्हा परिषद, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

-*-*-*

संबंधित पोस्ट

पिण्याच्या पाणी नियोजनानंतर सिंचनाचे आर्वतन निश्चित करावे – पालकमंत्री दादाजी भुसे

vishwatmaklokswamivarta

५३ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप व बक्षीस वितरण-बाल वैज्ञानिक देतील देशाच्या प्रगतीत योगदान- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

वारणा धरणात 29.48 टी.एम.सी.पाणीसाठा,कोयना धरणातून 52 हजार 100 तर वारणा धरणातून 11 हजार 575 क्युसेक्स विसर्ग..

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन 2023-24 प्राथमिक छाननी गुणांकन प्रसिध्द करण्यासाठी सूचना व हरकती पाठविण्याचे आवाहन..

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराजांना शिवतीर्थावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिवादन*

vishwatmaklokswamivarta

नांदेड जिल्ह्यासाठी 3 स्थानिक सुट्या जाहीर