
सनी देओलचा ‘गदर 3’ 2025 मध्ये येणार प्रेक्षकांच्या भेटीला, नव्या कलाकारांना मिळणार संधी..
बॉलीवूड प्रतिनिधी
बॉलीवूड अभिनेता सनी देओलच्या ‘गदर’ आणि ‘गदर 2’ या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असून प्रेक्षक आता या सिनेमाच्या तिसऱ्या भागाची प्रतीक्षा करत आहेत. आता लवकरच या गदर सिनेमाचे तिसरा ‘गदर 3’ या सिनेमाचं शूटिंग बनारसमध्ये होणार आहे.
सनी देओलच्या (Sunny Deol) ‘गदर’ आणि ‘गदर 2’ या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असून प्रेक्षक आता या सिनेमाच्या तिसऱ्या भागाची प्रतीक्षा करत आहेत. ‘गदर 3’ या सिनेमाचं शूटिंग बनारसमध्ये होणार आहे. 14-15 वेगवेगळ्या ठिकाणी या सिनेमाचं शूटिंग होणार आहे. ‘गदर 3’ या सिनेमात नाना पाटेकर मुख्य भूमिकेत असणार आहे. हा सिनेमा 2025 मध्ये स्वतंत्र्यदिनाच्या वेळी प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. अशी ही माहिती बॉलीवूडच्या सूत्रांकडून मिळत आहे



