
राज्यात मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान जाणीवपूर्वक हिंसा पसरवणार्यांवर कठोर कारवाईचे निर्देश – गृहमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्य प्रतिनिधी
सरकार मराठा आरक्षाबाबत सकारात्मक असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रात मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान जाणीवपूर्वक हिंसा पसरवणार्यांवर कठोर कारवाईचे निर्देश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आले आहेत.
महाराष्ट्रात मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान जाणीवपूर्वक हिंसा पसरवणार्यांवर कठोर कारवाईचे निर्देश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना समोर आल्या आहेत. घरात लोकं उपस्थित असताना घरं जाळण्याचा प्रयत्न करणार्यांवर कलम 307 म्हणजे हत्येचा प्रयत्न करण्याचे कलम लावण्याचे निर्देश देण्यात आल्याचं सांगण्यात आले आहे. बीड मधील घटनेचं समर्थन केले जाऊ शकत नाही असं म्हणताना सरकार मराठा आरक्षाबाबत सकारात्मक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.



