
महाराष्ट्र जनता दल(सेक्युलर) समाजवादी पक्षाच्या वळचणीला..
मुंबई / प्रतिनिधी : एच. डी.कुमारस्वामी यांच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या एच डी देवेगौडा यांनी पक्षाची तत्त्व आंनी ध्येय धोरणाला तिलांजली देत.जनता दल सेक्युलर पक्षाला भारतीय जनता पक्षाच्या दावणीला बांधण्याचा निर्णय घेतला त्याचा निषेध करीत आज महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी समाजवादी पक्षात.जाहीर प्रवेश केला .समाजवादी पक्षाचे.नेते.आमदार आणि असीम आझमी यांच्या उपस्थित हा पक्षप्रवेश सोहळा मुंबई मराठी पत्रकार संघाच्या.सभगृहात पार.पडला.
महाराष्ट्रातील बहुतांश कार्यकर्ते हे राष्ट्र सेवा दल आणि समाजवादी पक्षाच्या विचारसरणीचे.आहेत. भाजपशी केलेली जवळीक कार्यकर्त्यांना मान्य नाही. साने गुरुजी साथी एस एम. जोशी मधू.दंडवते ,.ना ग गोरे निहाल अहमद मृणाल गोरे यांच्या विचारांचा.वारसा नेत्यांनीच गहाण ठेवल्याची.भावना अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली .
मुस्लिम आरक्षण मराठा आरक्षण याक ज्वलंत विषयांसह डबघाईस आलेल्या हातमाग उद्योग वाचवण्यासाठी.आंदोलन छेडण्याचा.इशारा.अबू असीम आझमी यांनी यावेळी दिला .



