मोफत निवासी उद्योजकता विकास कार्यक्रमाचे आयोजन· भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष सामूहिक प्रोत्साहन योजना पुरस्कृत
बुलडाणा, प्रतिनिधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष सामूहिक प्रोत्साहन योजने अंतर्गत उद्योग संचालनालय पुरस्कृत अनुसूचित जाती प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती , नवउद्योजकांसाठी मोफत निवासी उद्योजकता विकास कार्यक्रमाचे आयोजन दि. 5 ते 22 डिसेंबर 2023 या कालावधीत करण्यात आले आहे. लाभार्थीची निवड करण्यासाठी उद्योजकता परिचय कार्यक्रम व आयोजन सैनिकी वसतिगृह, चिखली रोड, बुलडाणा येथे बुधवार दि. 29 नोव्हेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी गणेश गुप्ता (8275093201) जिल्हा उद्योग केंद्र, येथे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे