vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपूरमध्ये होणार..

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपूरमध्ये होणार..

 

 

 

            मुंबई प्रतिनिधी :- राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे गुरुवार दि. ७ डिसेंबर ते २० डिसेंबर २०२३ या कालावधीत होणार आहे.   विधानभवन येथे आज विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी  नागपूर येथे होणाऱ्या अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा झाली.

 

या बैठकीला विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विविध विभागाचे मंत्री, दोन्ही सभागृहाचे सदस्य, विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे संबंधित मान्यवर उपस्थित होते.

 

हिवाळी अधिवेशन गुरुवार दि ७ डिसेंबर २०२३ ते बुधवार दि.२० डिसेंबर २०२३ या कालावधीत घेणार आहे. हिवाळी अधिवेशनाचे एकूण दिवस १४ असून, यामध्ये प्रत्यक्ष कामकाज १० दिवस, तर सुट्या (शनिवार व रविवार मिळून) ४ दिवस आहेत.

 

0000

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा,पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

नवीन संसद भवन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी केंद्रीय अर्थ मंत्रालय जारी करणार 75 रुपयांचे स्मारक नाणे…

विधानपरिषद लक्षवेधी सूचना :नागरिकांना अधिक चांगल्या व जलद सेवा पुरविण्यासाठी इंटिग्रेटेड प्रणाली- राज्यमंत्री माधुरी मिसाळ

vishwatmaklokswamivarta

तरुणांसाठी खुशखबर : अकासा एअर करणार 1,000 जणांची भरती कर्मचारी कपातीच्या काळात आशेचा किरण…  .

अमली पदार्थ तस्करांवर कायद्याचा धाक यापुढेही कायम ठेवावा- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- अमली पदार्थ टास्क फोर्सच्या आठव्या बैठकीत घेतला आढावा….

४ तासांच्या कठीण शस्त्रक्रियेनंतर महिलेच्या पोटातून १० किलोचा गोळा काढला – स्त्रीरोगतज्ञ डॉ.राजश्री दयानंद कटके

vishwatmaklokswamivarta