vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी मुदतवाढ

पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी मुदतवाढ

 

लातूर, द प्रतिनिधी : राज्यात विमा योजना अंतर्गत 2023-24 मध्ये कोकणातील आंबा आणि राज्यातील काजू, संत्रा व रब्बी हंगामातील ज्वारी पिकासाठी विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक 30 नोव्हेंबर, 2023 असा होता. त्यास दोन दिवसांची मुदवाढ देण्यात आली असून त्याची वाढीव मुदत

 

4 व 5 डिसेंबर,2023 अशी आहे.

 

पीक विमा पोर्टलमध्ये काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे इच्छुक शेतकरी या योजनेत भाग घेण्यापासून वंचित राहिले आहेत. त्यांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी राज्य शासनाच्या विनंतीवरून केंद्र शासनाकडून या दोन दिवसांची अतिरिक्त मुदतवाढ देण्यात आली आहे.

 

तसेच कोकण व्यतिरिक्त राज्यातील उर्वरित भागातील आंबा पिकासाठी विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक 31 डिसेंबर, 2023 तर रब्बी हंगामातील गहू, हरभरा, रब्बी कांदा या पिकांसाठी विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक 15 डिसेंबर, 2023 असा आहे. या विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

 

***

संबंधित पोस्ट

खरीप हंगाम सन २०२४-२०२५ साठी पाणी अर्ज स्विकारणेचीअंतिम मुदत 1 सप्टेंबर 2024

हिंद दि चादर”अंतर्गत नरसी नामदेव येथे आज वारकरी संमेलन;* पूर्वतयारीचा घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta

आपत्ती नियंत्रणासाठी यंत्रणा सज्ज; आपत्ती नियंत्रण कक्ष २४ तास कार्यान्वित- आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजनआपत्ती कक्ष व हेल्पलाइन कार्यान्वित शासन, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा..

ठाणे, पालघर, नाशिक, रायगड जिल्ह्यातील महामार्गावरील खड्डे, वाहतूक कोंडीची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल..मुख्यमंत्री आज ठाणे-नाशिक महामार्गाची पाहणी करणार

देहेडकरवाडी ते लक्कडकोटला जोडणारा पुल बंद करुन जतन करण्याची मागणी

जालना शहरातील वाहतुकीच्या मार्गात बदल