vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

उद्योजक मुरलीधर गव्हाणे उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित,महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेचा उद्योगरत्न पुरस्कार मुरलीधर गव्हाणे यांना प्रदान…

उद्योजक मुरलीधर गव्हाणे उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित,महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेचा उद्योगरत्न पुरस्कार मुरलीधर गव्हाणे यांना प्रदान…

 

 

राज्य प्रतिनिधी

लातूर -हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील भोगाव धानोरा या लहानशा गावातील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील यशस्वी युवा उद्योजक मुरलीधर अप्पाराव गव्हाणे यांना महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेच्यावतीने दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा उद्योगरत्न पुरस्कार लातूर येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

लातूर येथील दगडोजीराव देशमुख सभागृहात सदरचा पुरस्कार वितरण सोहळा अतिशय दिमाखदारपणे संपन्न झाला. यावेळी लातूरनगरीचे माजी महापौर अ‍ॅड. दिपक सूळ, महात्मा फुले शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव, सुप्रसिद्ध कवि राजेसाहेब कदम, इफ्तेखार पटेल, नागनाथ लोखंडे, राजेंद्र देशपांडे, काबीरसर, सुजल जहागिरदार आदी मान्यवरांच्या हस्ते मुरलीधर गव्हाणे यांना सपत्नीक उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करून त्यांच्या कार्यकृतत्वाचा गौरव करण्यात आला. संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेत जडणघडण झालेले उद्योगरत्न मुरलीधर गव्हाणे हे अत्यंत संघर्षशील व्यक्तिमत्व आहे. 30 वर्षांपूर्वी आईचे छायाछत्र हरवले. वडिल दोन भाऊ शेती करतात. मुरलीधर गव्हाणे यांनी तब्बल 14 वर्षे परभणीच्या एका फायबर डोअर्स कंपनीमध्ये केले. या अनुभवातून त्यांनी स्वतंत्र उद्योग सुरु करण्याचा निश्‍चय केला आणि 2017 सालापासून वसमत परभणी रोडवर बळेगाव पाटीनजीक त्यांनी राजमाता जिजाऊ फायबर प्लस डोअर्स नावाने कंपनी सुरु केली. जिद्द आणि मेहनतीमुळे या उद्योगाची आज भरभराट झालेली दिसून येते. आज त्यांच्या या उद्योगाची वार्षिक उलाढाल 25 ते 30 लाख एवढी आहे. त्यांच्या या धडपडीची, जिद्दीची दखल घेवून महात्मा फुले शिक्षक परिषदेने त्यांना उद्योगरत्न पुरस्कार देवून मोठा गौरव केला आहे. तो आजच्या युवकांसाठी उर्जादायी, प्रेरणादायी असा आहे.

त्यांच्या पुरस्काराबद्दल महात्मा फुले शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव, लातूरचे माजी महापौर दिपक सूळ, राजेसाहेब कदम, पत्रकार शिवाजी कांबळे, संभाजी ब्रिगेडचे पिराजी गाडगे, भोगावचे सरपंच भिमराव कांबळे, अनिल कांबळे, सुदाम कदम, नागनाथ गव्हाणे, गोपीनाथ गाडगे, रामा घाटोळ, राजेंद्र गव्हाणे, बालाजी गव्हाणे, गंगाधर गव्हाणे,य गोविंद गव्हाणे, अविनाश गाडगे, भागवत अवचार, रामभाऊ वावरे, कृष्णा वावरे, गोविद काशिनाथ गव्हाणे, धम्मपाल कांबळे आदींसह अनेकांनी उद्योगरत्न मुरलीधर गव्हाणे यांचे अभिनंदन केले आहे.

संबंधित पोस्ट

लष्करप्रमुखांचा काश्मीर दौरा – अमरनाथ यात्रेपूर्वी सुरक्षा तयारीचा आढावा..

अंबादास दानवे हे मराठवाड्याच्या मातीतील अस्सल नेतृत्व- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेविरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना विधानपरिषदेत निरोप..

कौशल्य विकास केंद्राचा मंगळवारी रोजगार मेळावा

नव्या दिल्लीत,बारमध्ये काम करणाऱ्या युवतीची आत्महत्या, चौथ्या मजल्यावरुन उडी, बार मालकावर गंभीर आरोप..

vishwatmaklokswamivarta

माजी सैनिकांसाठी पोलादपूर येथे मेळाव्याचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

ओबीसी आरक्षणाची मागणी करणारे लक्ष्मण हाके यांची माहिती मराठा नेते मनोज जरांगे बारामतीच्या इशाऱ्यावर माघार घेतल्याचे दावा

vishwatmaklokswamivarta