vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

जिल्हा रुग्णालयात नवजात बालकांकरिता टॉवेल वाटपाचा कार्यक्रम संपन्न..

जिल्हा रुग्णालयात नवजात बालकांकरिता टॉवेल वाटपाचा कार्यक्रम संपन्न..

 

 

 

          राज्य प्रतिनिधी- जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे नवीन जन्माला आलेल्या बालकांना टॉवेल वाटपाचा कार्यक्रम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

 

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबादास देवमाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनीषा विखे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.शीतल जोशी (घुगे), जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ.चेतना पाटील, मेट्रन मॅडम भोपी, जिल्हा लेखा व्यव्यस्थापक संतोष पाटील, फायनान्स कम लॉजिस्टिक कंसल्टंट प्रथमेश मोकल, आरबीएसके डीपीएस सुनील चव्हाण, प्रसूती विभागातील इन्चार्ज सिस्टर, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सर्व अधिकारी व कर्मचारी हे प्रमुख उपस्थित होते.

 

जिल्हा रुग्णालयामध्ये प्रसूतीसाठी रायगड जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच आदिवासी वाडी, वस्ती व गरीब घरातून अशा विविध ठिकाणावरून प्रसूतीसाठी गरोदर माता येत असतात, याप्रमाणे जिल्हा रुग्णालयात दर महिन्याला 300 ते 350 प्रसूती मोफत केल्या जातात. यामध्ये गुंतागुंतीच्या तसेच सीझर करण्यात आलेल्या प्रसूतींचाही समावेश होत आहे. प्रसूतीसाठी आलेल्या गरोदर माता या दूर वरून तसेच घाई गडबडीमध्ये येत असल्यामुळे, येताना त्या कोणत्याही प्रकारचे कपडे/वस्त्र घेऊन येत नाहीत किंवा आणलेले वस्त्र हे जुने व अस्वच्छ असल्यामुळे, नवजात बालकाला आरोग्याच्या दृष्टीने संसर्ग होण्याची शक्यता असते. या काळात नवजात बालकांची आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. या सर्व बाबींचा विचार करून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नवजात बालकांना मोफत टॉवेल वाटपाचा नाविन्यपूर्ण

 

कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

 

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून जिल्हा रुग्णालयाचा होत असलेला पूर्ण कायापालट हा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबादास देवमाने व त्यांच्या सक्रिय टीम मुळे होत असल्याचे सांगून जिल्हा शल्यचिकित्सक यांचे विशेष कौतुक केले. या नाविन्यपूर्ण उपक्रमाकरिता सामाजिक बांधिलकीतून रिलायन्स इंडस्ट्रीज नागोठणे यांच्या सीएसआर फंडामधून आवश्यक ते सहकार्य मिळणार आहे.

 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, डापकु संजय माने यांनी केले.

 

0000000

संबंधित पोस्ट

ऑपरेशन प्रहारः अवैध मद्यविक्री प्रकरणी १२२ ढाबाचालक दोषी, लोकअदालतीत २६ खटल्यात ८ लाखांचा दंड वसूल…

vishwatmaklokswamivarta

केस व नख गळतीच्या आजारावर नियंत्रणासाठी केंद्रीय पथकाला निर्देश-केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव

लातूर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ;इच्छुकांकडून कर्ज प्रस्ताव मागविले

13 डिसेंबरला राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

चिखलीतील शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी ॲपद्वारे शेतातील पिकाची नोंदणी करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta