vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

कॅनडातील सरे येथे खलिस्तानी कट्टरपंथीयांकडून लक्ष्मी नारायण मंदिराचे अध्यक्ष सतीश कुमार यांच्या घरावर गोळीबार…

 

 

विदेश प्रतिनिधी

कॅनडाच्या ब्रिटीश कोलंबिया प्रांतातील सरे येथे एका प्रमुख हिंदू व्यावसायिकाच्या घरावर 14 राऊंड गोळ्या झाडण्यात आल्या. ही घटना 27 डिसेंबर रोजी सकाळी 8:03 वाजता 80 Avenue च्या 14900 ब्लॉकमध्ये घडली. 

हिंदू व्यावसायिकाच्या घरावर 14 राऊंड गोळ्या झाडण्यात आल्या. ही घटना 27 डिसेंबर रोजी सकाळी 8:03 वाजता 80 Avenue च्या 14900 ब्लॉकमध्ये घडली. सरे रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिस (RCMP) च्या निवेदनानुसार, लक्ष्य केलेले निवासस्थान सरे येथील लक्ष्मी नारायण मंदिराचे (Lakshmi Narayan Temple) अध्यक्ष सतीश कुमार (Satish Kumar) यांच्या मोठ्या मुलाचे आहे. सतीश कुमार यांनी इंडिया टुडेला सांगितले की, त्यांच्या मुलाच्या घरावर हल्ला करण्यात आला. घरावर किमान 14 राऊंड गोळीबार करण्यात आला.

कुमार यांनी सांगितले की, ‘हा हल्ला खलिस्तानींनी केला की खंडणीखोरांनी, हे मी सांगू शकत नाही. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.’ यापूर्वी तीनदा कथित खलिस्तानी कार्यकर्त्यांनी मंदिरालाही लक्ष्य केले होते. गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही, परंतु गोळ्यांच्या छिद्रांमुळे घराचे नुकसान झाले. पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला असून पुरावे तपासले आहेत.सरे आरसीएमपी जनरल इन्व्हेस्टिगेशन युनिटने तपास हाती घेतला आहे आणि अधिकारी हल्ल्यामागील हेतू निश्चित करण्यासाठी काम करत आहेत. खलिस्तानी गटांच्या वाढत्या उपद्रवी घटनांच्या अनुषंगाने, कॅनडातील हिंदू समुदायांची तोडफोड आणि मंदिरांना लक्ष्य करून हल्ले करण्यात वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली आहे

तथापी, काही दिवसांपूर्वी खलिस्तान्यांनी सरे येथील लक्ष्मी नारायण मंदिराची तोडफोड आणि ब्रॅम्प्टन आणि ग्रेटर टोरंटो परिसरातील मंदिरांमध्ये भारतविरोधी भित्तिचित्रांची फवारणी केली होती. कॅनडाच्या सरकारने या हल्ल्यांचा निषेध केला असून प्रभावित समुदायांना मदत करण्याचे वचन दिले आहे. हिंदू मंदिरांची विटंबना होत असल्याचा मुद्दा भारताने कॅनडासमोर अनेकदा मांडला आहे.

 

 

संबंधित पोस्ट

सिडनी, सिंगापूर, लंडन आणि दुबई येथून नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला फटाक्यांच्या आतिषबाजीचा कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

अफगाणिस्तान तालिबानच्या नव्या सरकारची घोषणा,आर्थिक संकट, पण तालिबान गडगंज श्रीमंत, कुठून येतोय इतका पैसा?

vishwatmaklokswamivarta

पाकिस्तानात ट्रेनमध्ये स्फोट; प्रवाशांची धावपळ अनेक लोक जखमी असल्याची सूत्रांची माहिती

vishwatmaklokswamivarta

नेपाळ मधील दुर्दैवी घटना नेपाळाच्या ‘तारा एअर’ कंपनीच्या विमान दुर्घटनेमध्ये सारे 22 प्रवासी दगावल्याची नेपाळच्य गृह विभागाचे प्रवक्ते पहाड दिनरमनी पोखरेल यांनी व्यक्त केली भीती…

ग्रीसमध्ये शेकडो प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बुडाले; 300 पाकिस्तानी लोकांच्या मृत्यूची भीती, पीएम शाहबाज शरीफ

vishwatmaklokswamivarta

अमेरिकेत प्रवेश करण्याच्या प्रयत्नात भारतीय कुटुंबासह 8 जणांचा मृत्यू