vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

मराठी बाणा, आगरी नृत्य कलाविष्कारांना उत्स्फूर्त प्रतिसाद..

मराठी बाणा, आगरी नृत्य कलाविष्कारांना उत्स्फूर्त प्रतिसाद..

 

 

रायगड प्रतिनिधी:- कोकणातील पारंपरिक लोककला त्याचबरोबर कलावंताचा गीत, संगीत, मराठी सण उत्सव परपंरांवर आधारित ‘मराठी बाणा’ कलाकृती तसेच स्थानिक कलाकारांचा कोळी संस्कृती दर्शविणाऱ्या कार्यक्रमाने आज रायगडकर मंत्रमुग्ध झाले. या दोन्ही कार्यक्रमाना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

 

सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय व रायगड जिल्हा प्रशासनाच्यावतीने अलिबाग येथील पोलीस परेड मैदानावर अशोक हांडे यांचे लेखन आणि संकल्पना असणारा ‘मराठी बाणा’ हा 70 एमएम मराठी कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, जिल्हा न्यायाधीश श्री भिलारे, जिल्हा न्यायाधीश श्री मणेर, विधी सेवा प्राधिकरण सचिव श्री शिंदे, उपवनसंरक्षक अमोल शिंदे यांसह जिल्हा प्रशासनातील विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात स्थानिक कलाकारांचा कोळी संस्कृती दर्शविणाऱ्या कार्यक्रमात कोळी नृत्य, आगरी नृत्याच्या माध्यमातून गीत, संगीत आणि नृत्याविष्कारातून गीत सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.

 

जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे शुभेच्छा देताना म्हणाले की, महाराष्ट्राची संस्कृती सातासमुद्रापार नेण्याची किमया महाराष्ट्राच्या विशेषत: कोकणच्या सुपुत्राने अशोक हांडेनी केली आहे. जागतिक पातळीवरही त्यांचे नाव घेतले जाते. आपली मराठी आणि मराठीची संस्कृती ही कोकणात न राहता ती जगभरात गेली आहे. या कार्यक्रमाचा रायगडकरांनी आस्वाद घेवून, भरभरुन दाद दिल्या बद्दल मनःपूर्वक आभार मानले.

 

उद्या दि. 14 फेब्रुवारी रोजी या कार्यक्रमात नंदेश उमप यांचा महाराष्ट्र संस्कृती कार्यक्रम होणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे यांनी केले.

 

या महोत्सवात विविध प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. पेण येथील श्री गणेश मूर्तीकार यांनी घडविलेल्या गणेशमूर्तीचे प्रदर्शन, शिवकालीन शस्त्र प्रदर्शन,शिवदुर्ग प्रदर्शन, स्थानिक बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादन दालन तसेच खाद्यपदार्थ दालन यामध्ये वारली कला, कोकण मेवा, दगडी वस्तू, मातीची भांडी, नारळापासून बनविलेले विविध कलाकुसर वस्तू, स्थानिक मसाले, बांबूपासून तयार केलेल्या वस्तू तसेच कृषी प्रक्रीया आधारित विविध दालन. या महोत्सवात 50 बचतगट सहभागी झाले आहेत. नागरिकांनी या प्रदर्शनास भेट घ्यावी असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भरत बास्टेवाड यांनी केले आहे.

 

००००००

संबंधित पोस्ट

कर्जत व जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीशेतकरी भवन उभारण्याच्या प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही करावी-महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांचे संचालक (पणन) यांना निर्देश

शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांसाठी राबविण्यात येणाऱ्यायोजनांसाठी 30 नोव्हेंबर पर्यंत प्रस्ताव सादर करा- जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे

कर्मचारी हाच एमआयडीसीचा कणा – उद्योगमंत्री उदय सामंत

vishwatmaklokswamivarta

आदि कर्मयोगी अभियानांतर्गत ब्लॉक मास्टर ट्रेनर प्रशिक्षणाला सुरुवात*

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव जम्मू-काश्मीरमध्ये : पर्यटकांशी साधला संवाद • पर्यटकांना सुखरूप घरी पोहोचविण्यासाठी विशेष रेल्वे- पर्यटकांच्या चेहऱ्यावर फुलल हास्य..

मागासवर्गीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांचेशासकीय सेवेत घवघवीत यश..