vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नेपाळ येथे 16 व्या वर्ल्ड सोशल फोरम परिषदेमध्ये सेवा संस्थेचे संस्थापक ॲड. अशोक पवार सहभागी

नेपाळ येथे 16 व्या वर्ल्ड सोशल फोरम परिषदेमध्ये सेवा संस्थेचे संस्थापक ॲड. अशोक पवार सहभागी

 

 

 

ठाणे, प्रतिनिधी:- 2024 ची 16 वी वर्ल्ड सोशल फोरम परिषद दि. 15फेब्रुवारी 2024 रोजी नेपाळची राजधानी काठमांडू येथे सुरू झाली असून या परिषदेसाठी सेवा संस्था, ठाणे चे संस्थापक ॲड. अशोक पवार सहभागी झाले असून बालकांचे हक्क व बालका संबंधित प्रश्न जसे बालकामगार, बालविवाह, बाल तस्करी, बालकांचे होणारे लैंगिक शोषण या प्रश्नांसंदर्भात सखोल विश्लेषण व उपाययोजनांचा सविस्तर आढावा ते या परिषदेत घेणार आहे.

 

सेवा संस्था गेली पंधरा वर्षे महाराष्ट्रातील परभणी व ठाणे जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापना सोबतच बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी कार्यरत आहे. परभणी व ठाणे येथील बालविवाहाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन संस्थेने बालविवाह विरोधी प्रतिबंधात्मक जनजागृती करण्याचे काम सेवा संस्था येथे करत आहे. नुकतेच सेवा संस्थेने कामगार विभाग (कल्याण ) यांच्या मदतीने ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथून जवळपास 8 बालकामगारांना मुक्त केले आहे.

 

नेपाळ येथे सुरू असलेल्या वर्ल्ड सोशल फोरमचे मुख्य उद्देश नागरी समाज संस्था, सामाजिक चळवळी कामगार संघटना, यांच्यामध्ये वैचारिक देवाण-घेवाण वाढवणे तसेच शांतता व न्यायप्रिय समाज प्रस्थापित करणे, हे असून परिषदेची थीम “Another world is possible” आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

जिल्हा प्रशासनाचे शून्य प्रलंबितता अभियान;कालबद्ध कार्यक्रमाची अंमलबजावणी करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

मापात पाप केल्यास शिक्षा अटळ;वजन-मापे अचुकतेची पडताळणी करण्याचे आवाहन

सोनं खरेदी करणं स्वस्त होणार? सरकारने ‘ती’ विनंती मान्य केल्यास ग्राहकांना दिलासा मिळणार..

vishwatmaklokswamivarta

स्वीप उपक्रमात नवी मुंबईतील विद्यार्थ्यांनी हस्तकला, रांगोळी प्रदर्शनातून दिला मतदानाचा संदेश…

जिल्ह्यातील विविध बँकांमध्ये दाव्याविना 176 कोटी रुपये पडून दावा न केलेल्या ठेवी परत मिळवण्यासाठीची मोहीम..

vishwatmaklokswamivarta

कोंकण भवनात संत रविदास महाराज यांच्या जयंतनिमित्त अभिवादन

vishwatmaklokswamivarta