vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

जिल्हाधिकाऱ्यांनी केली जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीची पाहणी

जिल्हाधिकाऱ्यांनी केली जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीची पाहणी

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी:- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीची पाहणी केली. सर्व विभागांना भेटी देऊन, विभागांच्या अडीअडचणी व तेथे करावयाच्या सुविधांच्या निर्मितीबाबत संबंधितांशी चर्चा केली.

 

निवासी उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी त्यांच्या समवेत उपस्थित होते. सकाळी जिल्हाधिकारी स्वामी यांनी जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीची पाहणी केली. प्रत्येक विभागात जाऊन कर्मचाऱ्यांच्या काम करण्याच्या जागेची पाहणी केली. तसेच कार्यालयातील दस्तऐवजांची मांडणी इ. पाहणी केली. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहांची स्थिती याबाबत पाहणी करुन माहिती घेतली. विद्युत जोडण्या, इंटरनेट जोडण्या आदींबाबत सुसुत्रता आणण्याचे निर्देश त्यांनी दिले. अग्निरोधक उपकरणे सर्वत्र असावे तसेच ते सुसज्ज असावे, असे निर्देश त्यांनी दिले. इमारतीत असणारे जुने, नादुरुस्त, निकामी वस्तू विहित प्रक्रिया राबवून निर्लेखीत करण्याचे निर्देश त्यांनी दिले. कार्यालयाची इमारत ही स्वच्छ व सुटसुटीत असावी. येणाऱ्या अभ्यागतांना तसेच कार्यालयातील कर्मचारी अधिकारी यांना काम करतांना प्रसन्न वाटायला हवे, अशा पद्धतीने ही रचना करावी, अशी सुचना त्यांनी केली. इमारत परिसराचीही त्यांनी पाहणी केली. वाहन तळ आदींबाबत निर्देश दिले.

 

००००००

संबंधित पोस्ट

सांगली जिल्ह्यात ईद-ए-मिलाद निमित्त16 सप्टेंबरची सार्वजनिक सुट्टी कायम

vishwatmaklokswamivarta

रानभाजी महोत्सवाचे 15 ऑगस्ट रोजी आयोजन* 

४५ वे वार्षिक पुष्पप्रदर्शन ८ व ९ फेब्रुवारी रोजी; सहभागाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

राज्यातील ४,९७५ आदिवासी गावांचा कायापालट होणार,प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानात समावेश

vishwatmaklokswamivarta

स्व. हर्षवर्धन आगाशे जिल्हास्तरीय लोकगीत समूहगान करंडक स्पर्धेचे आयोजन

जानोरी येथील सभेत संदीप शेळके कडाडले! भाऊ, साहेब, ताईंनी जिल्ह्यासाठी केले काय? शेतकऱ्यांच्या समस्यांवर सभागृहात ‘मुके’ राहणारे हे कसले नेते?? म्हणाले खासदारकीची संधी द्या, जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करू

vishwatmaklokswamivarta