vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

तहानलेल्या गावांच्या मदतीला धावले सतीश घाटगे दुष्काळग्रस्त गावासाठी समृध्दी कारखान्याने सुरु केले दहा टँकर  

तहानलेल्या गावांच्या मदतीला धावले सतीश घाटगे दुष्काळग्रस्त गावासाठी समृध्दी कारखान्याने सुरु केले दहा टँकर

राज्य प्रतिनिधी

घनसावंगी: अंबड , घनसावंगी तालुक्यात अपुऱ्या पावसामुळे अनेक गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाकडून अद्यापही हालचाली सुरू न झाल्याने समृध्दी कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी समृध्दी कारखान्यामार्फत गुरुवारी दहा पाण्याचे टँकर सुरू केले. यामुळे टंचाईग्रस्त गावांना मोठा दिलासा मिळाला आहे. या मदतीबद्दल  गावकऱ्यांनी सतीश घाटगे यांचे आभार मानले.

 

 

मार्च महिन्याच्या सुरुवातीला घनसावंगी मतदारसंघात अनेक गावांत पाणी टंचाई निर्माण झाली आहे. अनेक ग्रामपंचायतीनी पाणी टँकर सुरु  करण्याची मागणी  पंचायत समिती कार्यालयात केली  आहे. परंतु, अद्याप गावात टँकर सोडण्यासाठी हालचाली सुरू झाल्या नाही. तहानलेल्या गावकऱ्यांची तहान भागविण्यासाठी भाजप नेते सतीश घाटगे यांनी प्रशासनावर अवलंबून न राहता स्वतः पुढाकार घेऊन समृध्दी साखर कारखान्यामार्फत दहा टँकर सुरू केले. पाणी टंचाई निर्माण झालेल्या सिध्देश्वर पिंपळगाव व बाचेगाव येथे गुरुवारी त्यांनी  टँकर सुरु केले.कारखान्यामार्फत पाण्याचे टँकर गावात आल्यानंतर गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.विशेष करून महिलांनी  सतीश घाटगे यांचे आभार मानले.

कोट

तहानलेल्या प्रत्येक गावाला करणार मदत

उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागते. यात लहान मुले -मुलींची देखील धावपळ होते. सामाजिक बांधिलकी म्हणून समृध्दी कारखान्यामार्फत हे टँकर सुरू केले आहे.घनसावंगी मतदारसंघातील ज्या गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे ,अशा गावातील गावकऱ्यांनी माझ्या जनसेवा कार्यालयास टँकर सुरू करण्यासाठी अर्ज करावा.

 

सतीश घाटगे, भाजप नेते, तथा चेअरमन समृद्धी साखर कारखाना

संबंधित पोस्ट

जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा

माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ योजनेस मंत्रिमंडळाची मान्यता लोकसहभागातून आरोग्यदायी महाराष्ट्र घडविण्याचा निर्धार

vishwatmaklokswamivarta

काढणीपश्चात व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गतविविध घटकांच्या लाभासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन

ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठातांची चौकशी सुरु- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

कोषागार दिनी कुंडल वन प्रबोधिनीत वृक्षारोपण..

vishwatmaklokswamivarta

राज्यामध्ये प्रती आणि समृद्धी सरकार –उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकरी आपला अन्नदाता, आपला मायबाप ; बियाणे अतिशय उत्कृष्ट प्रतीची हवीत