vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

धारावीत १८ मार्च रोजी सर्वेक्षण सुरू होणार,लाखो अनौपचारिक रहिवाशांकडून डिजिटल पद्धतीने डेटा संकलित करणार..

धारावीत १८ मार्च रोजी सर्वेक्षण सुरू होणार,लाखो अनौपचारिक रहिवाशांकडून डिजिटल पद्धतीने डेटा संकलित करणार..

 

सारांश:* कमला रमण नगर येथून सर्वेक्षण सुरू होणार* अनौपचारिक सदनिका रहिवाशांच्या पात्रतेवर महाराष्ट्र शासन निर्णय घेणार* स्वदेशी विकसित ॲपद्वारे डेटा जमा करणार* प्रत्येक अनौपचारिक सदनिकेला एक वेगळा क्रमांक देण्यात येणार* माहिती गोळा करण्यासाठी 1800-268-8888 हा टोल-फ्री क्रमांक

 

 

 मुंबई प्रतिनिधी मुंबई, मार्च 11, २०२४: धारावीतील लाखो अनौपचारिक सदनिका रहिवाशांकडून माहिती गोळा करण्यासाठी १८ मार्च, 2024 रोजी सर्वेक्षण सुरू करण्यात येईल, असे महाराष्ट्र सरकार आणि अदानी समूह यांच्यातील संयुक्त उपक्रम असलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडने (डीआरपीपीएल) आज जाहीर केले. प्रस्तावित पुनर्विकास प्रकल्पांतर्गत पुनर्वसन पात्रता निकष निश्चित करण्यासाठी राज्य सरकार या माहितीचा उपयोग करणार आहे. या सर्वेक्षणामुळे जगातील सर्वात मोठ्या अनौपचारिक वसाहतींपैकी एक असलेल्या धारावीवर प्रथमच ‘डिजिटल धारावी’ ही प्रगत लायब्ररी तयार होणार आहे.

 

“धारावी पुनर्विकास प्रकल्प (DRP) आणि महाराष्ट्र सरकारतर्फे करण्यात येणारे हे सर्वेक्षण जगातील सर्वात मोठ्या नागरी पुनरुज्जीवन प्रकल्पांपैकी एक असून मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी हे पहिले पाऊल आहे. मुंबई शहरांतर्गत धारावीला जागतिक दर्जाच्या शहरामध्ये रूपांतरित करण्याची ही सुरुवात आहे. या उपक्रमात सर्व धारावीकरांनी सहभागी होऊन पाठिंबा द्यावा असे आम्ही आवाहन करतो, ज्यामुळे आम्हाला पुनर्वसन प्रक्रिया पार पाडता येईल आणि शेवटी त्यांना त्यांच्या स्वप्नातील घर प्रदान करता येईल,” असे DRPPLच्या प्रवक्त्याने सांगितले.

 

या सर्वेक्षणाला कमला रमण नगर येथून प्रारंभ होणार असून, प्रत्येक अनौपचारिक सदनिकांना एक विशिष्ट क्रमांक देण्यात येणार आहे. यानंतर संबंधित गल्लीचे लेसर मॅपिंग करण्यात येईल. ज्याला ‘लिडार सर्व्हे’ म्हणून ओळखले जाते. त्यानंतर कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी एक प्रशिक्षित टीम स्वदेशी विकसित केलेल्या ऍपसह प्रत्येक सदनिकेला भेट देणार आहे.

 

धारावीकरांच्या प्रश्नांना आणि समस्यांना उत्तर देण्यासाठी टोल फ्री क्रमांक- 1800-268-8888 सक्रिय करण्यात आला आहे.

 

धारावीकर गेल्या अनेक दशकांपासून त्यांच्या स्वप्नातील घरे आणि दुकानांमध्ये जाण्यासाठी पुनर्विकासाची वाट पाहत आहेत. आता, धारावीला जागतिक दर्जाच्या टाउनशिपमध्ये रूपांतरित करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने तेथील लाखो रहिवाशांचे नशिब बदलणार आहे.

 

महाराष्ट्र सरकारच्या DRP योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक अनौपचारिक सदनिकाधारकाला घर मिळेल. अशा प्रकल्पात प्रथमच सर्व पात्र -अपात्र सदनिकाधारकांनाही घरे मिळणार आहेत. अलीकडे, DRPPL ने जाहीर केले की, DRP निविदेतील अटी शर्तीनुसार, सर्व पात्र आणि अपात्र रहिवासी सदनिकाधारकांना स्वतंत्र स्वयंपाकघर आणि शौचालयासह फ्लॅट मिळेल.

 

तसेच, पुनर्विकसित धारावीमधील पात्र औद्योगिक आणि व्यावसायिक आस्थापनांना त्यांच्या व्यवसायांना चालना देण्यासाठी आणि औपचारिकता देण्यासाठी राज्य वस्तू आणि सेवा करातून (SGST) पाच वर्षे सवलत देण्यात आली आहे. निविदा अटींनुसार ही सवलत देनाय्त आली आहे.

 

धारावीमध्ये कपडे आणि चामड्याच्या वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या हजारो औद्योगिक आणि व्यावसायिक युनिट्सचा समावेश होतो. त्यापैकी अनेकजण जगभरात विकल्या जाणाऱ्या मोठ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रँडचे पुरवठादार आहेत. ज्याची उलाढाल लाखो डॉलर्समध्ये आहे. ते स्थानिक आणि जागतिक स्तरावर त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी उत्सुक आहेत.

 

DRPPL ने जागतिक दर्जाच्या शहराची रचना करण्यासाठी जगप्रसिद्ध शहर आणि पायाभूत सुविधा नियोजन तज्ञांपैकी अमेरिकास्थित डिझाइन फर्म सासाकी आणि यू.के.स्थित नगर नियोजक बुरो हॅपोल्ड – यांना आपल्या सोबत घेतले आहे.

 

धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रा. लि (DRPPL) विषयी-

 

धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेड (DRPPL) हा महाराष्ट्र सरकार आणि अदानी समूह यांच्यातील संयुक्त उपक्रम म्हणून तयार करण्यात आलेला एक विशेष उद्देश प्रकल्प आहे. धारावीकरांना आधुनिक घरे उपलब्ध करून देऊन आणि त्यांच्यातील उद्योजकतेची अंगभूत भावना जपून त्यांच्या जीवनात परिवर्तन आणि सुधारणा करण्याचा DRPPL चा प्रयत्न आहे. मनुष्य केंद्रीभूत ठेवून केले जाणारे हे परिवर्तन रिकाम्या जागेची पुनर्बांधणी आणि सामुदायिक जगण्यातील आनंदाचा पुन्हा शोध घेणारे आहे, येथे वाहतूक सुविधा, वीज, पाणी आणि इंटरनेट या अत्याधुनिक अत्यावश्यक गोष्टींची जोडणी करणे आणि कोणत्याही निकषावर सर्वोत्कृष्ट ठरतील अशा नागरी सुविधांसह एक स्वच्छ वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.

संबंधित पोस्ट

आर्थिक सक्षमतेच्या ‘डबल ए प्लस स्टेबल (AA+ STABLE)’ या राष्ट्रीय पत मानांकनाची नवी मुंबई महानगरपालिका सलग अकराव्यांदा मानकरी..

मेरा रेशम मेरा अभियान अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन

56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागातील चित्रपटांची घोषणा इफ्फी 2025 मध्ये प्रतिष्ठित ‘सुवर्ण मयूर’ पुरस्कारासाठी पंधरा चित्रपट स्पर्धेच्या रिंगणात

vishwatmaklokswamivarta

डिजीटल युगात प्रत्येकाने जबाबदारीने इंटरनेट वापरावे- जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

vishwatmaklokswamivarta

जम्मू काश्‍मीरमधील घातपातामागे ‘फाल्कन स्क्वॉड….

स्थानिक स्वराज्य संस्थांचे विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी-हडकोच्या 2 हजार कोटींच्या कर्जास शासन हमी, हमी शुल्क माफ