vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्मप्रदेश

परोपकाराचे प्रत्यक्ष स्वरूप दर्शववणारा मानव एकता दिवस मनुष्य जीवन परोपकारासाठी समर्पित व्हावे- सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज..

परोपकाराचे प्रत्यक्ष स्वरूप दर्शववणारा मानव एकता दिवस मनुष्य जीवन परोपकारासाठी समर्पित व्हावे- सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज..

 

राज्य प्रतिनिधी : निराकार प्रभुने आम्हाला हे जे मानव जीवन दिले आहे त्याचा प्रत्येक क्षण मानवतेसाठी समर्पित व्हावा, असा परोपकाराचा सुुंदर भाव आपल्या हृदयात उत्पन्ि होतो तेव्हा खरुं तर अवघी मानवता आम्हाला आपली वाटू लागते. असे उद्गार सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी मरानव एकता दिवस प्रसंगी भाविक भक्तगणांना संबोधित करतांना व्यक्त केले.

मानव एकता दिवसाच्या पावन पर्वावर गांधी चमन जवळील रेल्वे स्टेशन रोडवरील संत निरंकारी सत्संग भवनात मानव एकता दिवसानिमित्त विशेष सत्संग समारोहांचे आयोजन करण्यात आले होते. बाबा गरुबचतनसिंहजी यांनी मानलवतेच्या प्रति केलेल्या महान सेवांसाठी समर्पित असून त्यातून प्रेरणा घेऊन निरंकारी जगतातातील प्रत्येक भक्त आपल्या जीवनाचे कल्याण करत आहे.

संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिेबल फाऊंडेशनच्यावतीने संपूरॅ भारत वर्षात जवळपास 207 ठिकाणी विशाल रुपात रक्तदान शिबिरांच्या श्रृखलेचे आयोजन करण्यात आले. ज्यामध्ये सुमारे 50,000 युनिट रक्त संकलीत करण्यात आले. त्यामध्ये दिल्लतील ग्राऊंड न. 02 निरंकारी चौक, बुराडी येथे आयोजित रक्तदान शिबिरात समस्त रक्तदात्यांनी स्वेच्छेने व अत्यंत उत्साहाने साधारणत: 1500 युनिट रक्तदान केले. या प्रसंगी निरंकारी राजपिता रमितजी यांनीही रक्तदान केले. जे मिशनच्या भक्तांसाठी व युवा सेवादारांसाठी नि:संशयपणे एक प्रेरास्त्रोत बनले. या सर्व रक्तादन शिबीरांमध्ये रक्तादानापूर्वी आवश्यक असलेल्या सर्व तपासण्या करण्यात आल्या. तसेच स्वच्छतेतेची विशेष काळजी घेण्यात आली. रक्तदानात्यांसाठी उत्तमप्रकारे अल्पोहाराची व्यवस्था करण्यात आली होती.

मानव एकता दिवस प्रसंगी आयोजित रक्तदान शिबिरात जनसमुदायाला संबोधित करतांना सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज म्हणाल्या, की सेवा ही नेहमी निष्काम भावनेनेच केली जाते. अशी भावना जेव्हा आपल्या र्‍ंंहदयात निवास करते तेव्हा खर्‍या अर्थाने आपले जीवन मानवतेच्या कल्याणार्थ समर्पित होते. असेच परोपकारी जीवन बाबा गुरुबचनसिंहजी यांच्या दिव्य शिकवणूकीचा आधार राहिला आहे.

निष्काम सेवेच्या सुंदर भावनेविषयी बोलतांना सद्गुरु माताजींनी समजावले.

की, जेव्हा आमच्या मनामध्ये निष्काम सेवेचा भाव उत्पन्न होऊ लागतो तेव्हा हे जग आणखी सुंदर दिसू लागते. कारण त्यावेळी आमची सेवाभावना साकार व कर्मरुप धारण करुन समस्त मानव परिवारासाठी वरदान बनून जाते.

रक्तदान ही मनुष्य जीवन वाचविण्यासाठी केली जाणारी एक अशी सर्वोपरि सेवा आहे. ज्यामध्ये परोपकाराची नि:स्वार्थ भावना निहित आहे.

संबंधित पोस्ट

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी महाडिबीटी पोर्टलवर दुरस्ती करुन घ्यावी

स्वीप समितीच्या वतीने ‘मनपा ऑन एअर’ उपक्रम-विविध रेडिओ वाहिन्यांवरून प्रेरक मुलाखती व संदेश प्रसारित…

vishwatmaklokswamivarta

अमली पदार्थांबाबतची माहिती 112 या क्रमांकावर द्यावी- जिल्हाधिकारी अशोक काकडे, सांगली जिल्हा एनकॉर्ड समितीच्या बैठकीत घेतला आढावा…

vishwatmaklokswamivarta

पुणे विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत*  *पुणे संघास सर्वसाधारण विजेतेपद तर कोल्हापूर संघास उपविजेतेपद* 

vishwatmaklokswamivarta

नागपुरात दंगल करणाऱ्या दंगलखोरांची प्रॉपर्टी विकून नुकसान भरपाई वसूल करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री आढळल्यास ग्राहकांनी टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी- सहायक आयुक्त (अन्न) रा. अ. समुद्रे- अन्न पदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांची धडक तपासणी मोही- 9 अन्न व्यावसायिकांचे परवाने निलंबित, 51 जणांना सुधारणा नोटीस- आतापर्यंत पावणेचार लाखाहून अधिक किंमतीचा खाद्यतेलाचा साठा जप्त

vishwatmaklokswamivarta