vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; २३.५५ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; २३.५५ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त…

 

राज्य प्रतिनिधी

उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 मे रोजी अवैध दारू निर्मिती करणाऱ्यांवर कारवाई केली. या संपूर्ण कारवाईमध्ये 59 हजार 980 लीटर दारू व इतर भट्टी साहित्यासह एकूण 23 लाख 55 हजार 210 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

ही कारवाई ठाणे जिल्ह्यातील दिवा गाव, घेसर, खर्डी, अलीमघर, छोटी देसाई, मोठी देसाई, आगासन, सरळांबे, अंजुर, वाशाळा, वासरगाव, हाजी मलंग, कुशिवली, माणेरागाव, द्वारलीपाडा, कुंभार्ली, केवणी, कालवार, वडुनघर, मामेखर्डी, कारीवली, मामणोली, जांभुळगांव, नांदपगाव, केशव सृष्टी, उत्तन, मुरदागाव, कोपराखाडी, गोराई खाडी आदी ठिकाणी करण्यात आली आहे. या संपूर्ण कारवाईमध्ये 31 दारूबंदी गुन्हे नोंद करण्यात आले आहे.

 

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, संचालक प्रसाद सुर्वे, कोकण विभागीय उप आयुक्त प्रदीप पवार, ठाणे अधीक्षक एन. व्ही सांगडे, उपअधीक्षक एस. टी माळवे, मुंबई शहरचे उपअधीक्षक सुधीर पोकळे, मुंबई उपनगर उपअधीक्षक मनोज चव्हाण, सुनील जाधव, जे. एस गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच लोकसभा निवडणूक आचार संहितेचे गांभीर्य लक्षात घेता उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकांनी ही कारवाई केली आहे. ही कारवाई संबंधित विभागाचे निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, जवान यांनी केली आहे, असे कोकण उपआयुक्त प्रदीप पवार यांनी कळविले आ

हे.

संबंधित पोस्ट

आताची मोठी बातमी – धारावी बस डेपो जवळ गैस सिलेंडरच्या ट्रक मध्ये लागली आहे भीषण आग…

काँग्रेस चे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर त्यांच्या राहत्या घरी निधन

vishwatmaklokswamivarta

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024उमेदवारांना नामनिर्देशन दाखल करण्याच्या कार्यपध्‍दतीचे आदेश जारी..

स्त्रीशक्तीला वगळून कोणतीही संघटना उभारता येणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ  मोहन भागवत यांनी महिलां शक्तीविषयी भाष्य केले.

महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणुकीमध्ये BJP ला पाचही जागांवर यश; महाविकास आघाडीला मोठा धक्का

vishwatmaklokswamivarta

मुंबई महानगरपालिके चे आवाहन- पाइपलाइन कामासाठी- 30 तास पाणीपुरवठा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. बुधवार, 5 फेब्रुवारी, 2025 रोजी सकाळी 11 वाजता शटडाउन सुरू होईल आणि गुरुवार, 6 फेब्रुवारी, 2025, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहील

vishwatmaklokswamivarta