vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशराजकारणस्थानिक बातम्या

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतले श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन बारामती ते काटेवडी वारकऱ्यांसोबत पायी चालत वारीत सहभाग

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतले श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन

बारामती ते काटेवडी वारकऱ्यांसोबत पायी चालत वारीत सहभाग…

 

 

राज्य प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सपत्नीक बारामती येथे पालखी सोहळ्याला भेट देऊन जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले. त्यांनी बारामती ते काटेवडी वारकऱ्यांसोबत पायी चालत वारीत सहभाग घेतला.

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ च्या जयघोषात, टाळ मृदंगाच्या गजरात, हाती दिंड्या-पताका, मुखी विठ्ठल नाम अशा भक्तिमय वातावरणात आज सकाळी काटेवाडीकडे प्रस्थान झाले. यावेळी खासदार सुनेत्रा पवार, अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, उपमुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव हनुमंत पाटील, महावितरणचे मुख्य अभियंता सुनील पावडे, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उप विभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी अनिल बागल आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी पुष्पहार अर्पण करून संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले. त्यांनी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसोबत संवाद साधला आणि टाळाच्या साथीने विठूनामाचा गजर केला.

 

पालखी मार्गावरील असलेल्या गावातील चौकात रांगोळी काढून, फुलांची उधळण करत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा आज इंदापूर तालुक्यातील सणसर येथे मुक्काम असणार आहे.

संबंधित पोस्ट

दक्षिण मुंबईतील 388 इमारतींच्या पुनर्विकासाला महाराष्ट्र सरकारची मंजुरी; 40,000 हून अधिक कुटुंबांना होणार फायदा

vishwatmaklokswamivarta

अतनुर गावाजवळील पुलाच्या कामामुळे वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली

शरद पवार गटाकडून साताऱ्यातून शशिकांत शिंदेंना उमेदवारी, तर रावेरमधून श्रीराम पाटील यांनाही उमेदवारी

vishwatmaklokswamivarta

डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि डॉ.एस.आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्काराकरिता अर्ज करावेत…

चेंबुर विधानसभेतील बहुजन समाज पक्षाच्या अधिकृत क्रियाशील तरुण, तडफदार, महिला उमेदवार सौ अनिता पाटोळे यांचे सर्व समाज बांधवांसह आंबेडकरी जनतेस नम्र आवाहन…

vishwatmaklokswamivarta

जन्म त्रिशताब्दी निमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चर्चगेट स्थानकाजवळील पुतळ्याचे सुशोभीकरण,• महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय• महेश्वर येथील राजवाडा, इंदोर येथील वास्तूशिल्प, काशीविश्वनाथ मंदिराचा केलेला जीर्णोध्दार कलात्मक स्वरुपात साकारणार..