vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महाडीबीटी प्रणालीवर अनुसूचित जाती विद्यार्थ्यांनी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती अर्ज भरण्याचे आवाहन

महाडीबीटी प्रणालीवर अनुसूचित जाती विद्यार्थ्यांनी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती अर्ज भरण्याचे आवाहन

 

बुलडाणा, प्रतिनिधी : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्याकरिता महाडीबीटी प्रणालीवर भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, मॅट्रीकोत्तर शिक्षण फी, परीक्षा फी, अकरावी, बारावीसाठी राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, निर्वाह भत्ता योजना राबविण्यात येते. यासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील महाडीबीटी पोर्टलवर अनुसूचित जाती प्रवर्गाकरीता नवीन व नुतनीकरण योजनांचे अर्ज भरण्याची सुविधा दि. 25 जुलैपासून सुरू केली आहे. संस्था, महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी महाडीबीटी पोर्टलवरील अनुसूचित जाती विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, फ्रीशिपचे अर्ज तातडीने भरून फी मंजूरीची कार्यवाही करावी.

 

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी नवीन अर्ज भरताना आधार नोंदणीकृत अर्ज भरणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न असल्याची पडताळणी आधार पोर्टलवर resident.uidai.gov.in/bankmapper करावी. विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवरील प्रणालीद्वारे निर्गमित झालेले पेमेंट व्हाउचर विद्यार्थी लॉगिन मध्ये जाऊन त्वरित रीडीम करावेत. यासाठी विद्यार्थ्यांनी आपला युजर आयडी आणि पासवर्ड जतन करुन ठेवणे आवश्यक आहे. महाडीबीटी प्रणालीमध्ये नोंदणीकृत होत असताना तयार केलेले लॉगीन आयडी विद्यार्थ्यांनी कायमस्वरुपी लक्षात ठेवावा. जेणेकरुन कोणताही लॉगीन आयडी दुबार तयार होणार नाही. तसेच आपला लॉगीन आयडी व पासवर्डची माहिती गोपनीय ठेवल्यास याचा दुरुपयोग होणार नाही.

 

सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील ज्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे अर्ज विद्यार्थीस्तर, तसेच महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असतील अशा अर्जांची पडताळणी करुन परिपूर्ण अर्ज विद्यार्थी, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्यांनी तात्काळ ऑनलाईन भरून घ्यावेत. महाविद्यालयांनी महाविद्यालयस्तरावरील स्कुटीनी पर्यायाचा वापर करुन प्रलंबित अर्ज फॉरवर्ड करत असताना प्रणालीमध्ये दर्शविण्यात आलेल्या सर्व बाबींची खात्री करुन पात्र अर्ज मंजुरीसाठी विहित मुदतीत जिल्हा कार्यालयास प्रणालीद्वारे ऑनलाईन पाठविण्यात यावेत.

 

विद्यार्थी आणि महाविद्यालयांना शिष्यवृत्तीचा पहिला हप्ता मिळालेला आहे, त्यांनी दुसऱ्या हप्त्याकरीता महाविद्यालय लॉगीनमधून द्वितीय सत्राची उपस्थिती अद्यावत करुन अर्ज मंजुरीसाठी पाठवावेत. महाविद्यालययाच्या लॉगीनमध्ये अलॉटमेंट डेटवाईज रिपोर्ट या पर्यायाचा वापर करुन अर्ज अलॉट झाल्याची महाविद्यालयाने पडताळणी करावी. नॉट अलॉटेड अर्जाबाबत त्रृटी पुर्तता करण्यासाठी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना त्वरीत अवगत करावेत.

 

महाविद्यालयांना लॉगीनमध्ये डीबीटी डॅशबोर्ड पर्यायाचा वापर करुन शिष्यवृत्ती बाबत महाविद्यालय निहाय तपशिलवार अहवाल दिसतो. महाविद्यालय लॉगीनमध्ये तीन पर्यायामध्ये विद्यार्थी आणि महाविद्यालयांना शिष्यवृत्ती वितरण झालेल्या स्थितीचा अहवाल दिसून येतो. महाविद्यालयाच्या प्राचार्य लॉगीनमध्ये अर्ज क्रमांक निहाय शोध घेतलेल्या अर्ज क्रमांकाला क्लिक केल्यानंतर सदर अर्जासंबधीत पोर्टल बाबतच्या त्रृटींची माहिती महाविद्यालय लॉगीनमध्ये विद‌्यार्थीनिहाय प्रणालीमध्ये दर्शविण्यात येते. त्यानुसार विद्यार्थ्यांचे आधार अथवा बँक खात्यासंबधीत त्रृटी असल्यास संबंधित विद्यार्थ्यांना अवगत करावेत. विद्यार्थी आणि महाविद्यालयांना महाडीबीटी पोर्टलवरील अडचणीबाबत तक्रार करण्याची सुविधा आहे.

 

सन 2024-25 व 2023-24 या वर्षातील मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परिक्षा फी, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रम निर्वाह भत्ता योजनेंतर्गत कार्यवाही केली नसल्यास अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्यास प्राचार्य जबाबदार राहृणार आहे, असे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी कळविले आहे.

 

00000

 

 

संबंधित पोस्ट

पत्रकारांनी एआय जनरेटेड कंटेंट वापरताना पडताळणी करणे आवश्यक- प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह

vishwatmaklokswamivarta

शासनाच्या १०२७ सेवा १५ ऑगस्टपासूनएकाच पोर्टलवरून- संजय काटकर

आपत्तीग्रस्तांसाठी केंद्र सरकार ने महाराष्ट्राला आर्थिक मदत जाहीर

vishwatmaklokswamivarta

भारतीय जनगणना २०२७’ विषयक प्रशिक्षण सत्राच्या उद्घाटन 

vishwatmaklokswamivarta

वंदे मातरम गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त होणार सामुहिक गायन …

vishwatmaklokswamivarta

राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), येथेअभिरुप मुलाखत कार्यक्रम-2024

vishwatmaklokswamivarta