vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधीठळक बातम्या

माजी भारतीय क्रिकेटपटू आणि मुख्य प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांचे वयाच्या 71 व्या वर्षी निधन; प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक

माजी भारतीय क्रिकेटपटू आणि मुख्य प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांचे वयाच्या 71 व्या वर्षी निधन; प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक.

 

राज्य प्रतिनिधी:माजी भारतीय क्रिकेटपटू आणि मुख्य प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांचे वयाच्या 71 व्या वर्षी निधन; प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक.,..

भारतीय क्रिकेट संघाचे माजी दिग्गज फलंदाज आणि टीम इंडियाचे प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. ते 71 वर्षांचे होते. अंशुमन गायकवाड हे बऱ्याच दिवसांपासून ब्लड कॅन्सरने त्रस्त होते आणि त्यांच्यावर लंडनमध्ये उपचार सुरू होते

भारतीय क्रिकेट संघाचे माजी दिग्गज फलंदाज आणि टीम इंडियाचे प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. ते 71 वर्षांचे होते. अंशुमन गायकवाड हे बऱ्याच दिवसांपासून ब्लड कॅन्सरने त्रस्त होते आणि त्यांच्यावर लंडनमध्ये उपचार सुरू होते. आता एकेकाळी वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाच्या जीवघेण्या वेगवान गोलंदाजांचा सामना करणारा हा दिग्गज फलंदाज जीवनाची लढाई हरला. बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी अंशुमन गायकवाड यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

 

साधारण 1970-80 च्या दशकात भारतीय क्रिकेट संघाचा भाग असलेल्या अंशुमन गायकवाड यांच्यावर लंडनच्या किंग्ज कॉलेज हॉस्पिटलमध्ये ब्लड कॅन्सरवर उपचार सुरू होते. माजी कर्णधार कपिल देव आणि संदीप पाटील यांच्यासारख्या सहकाऱ्यांनी बीसीसीआयकडे गायकवाड यांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची विनंती केली होती. यानंतर 14 जुलै रोजी बीसीसीआयने गायकवाड यांच्या उपचारासाठी 1 कोटी रुपयांची घोषणा केली होती. गायकवाड यांनी 1974 मध्ये भारतासाठी पदार्पण केले. त्यांनी 40 कसोटी आणि 15 एकदिवसीय सामने खेळले. 1975 आणि 1979 च्या वर्ल्ड कपमध्येही ते टीम इंडियाचा भाग होते. 1997 ते 1999 आणि पुन्हा 2000 मध्ये त्यांनी भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणूनही काम पाहिले आहे.

संबंधित पोस्ट

झारखंड, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील सात जिल्ह्यांमध्ये भारतीय रेल्वेच्या दोन बहुमार्गिका प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मान्यता; यामुळे रेल्वेचे जाळे सुमारे 318 किलोमीटरने वाढणार

पावसाची उसंत मुंबईकरांना दिलासा; ‘या’ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा…

vishwatmaklokswamivarta

गुरु स्वतःसाठी न लढता समाजासाठी लढतो; हा आदर्श येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आव्हाड म्हणाले मुझफ्फर हुसेन यांची सल्तनत संपवयाची आहे; बंटी माझे काहीही बिघडू शकणार नाही

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’; ४ लाभार्थ्यांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते कार्य प्रशिक्षण आदेश

बंगळुरु येथे नुकत्याच पार पडलेल्या विरोधकांच्या इंडिया वर असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयमएमआयएम पक्षा ची जोरदार टीका.