vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुकस्थानिक बातम्या

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत घेण्यात येणाऱ्या, राज्य नाट्य स्पर्धेतील प्रवेशिका सादर करण्यास 5 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत घेण्यात येणाऱ्या, राज्य नाट्य स्पर्धेतील प्रवेशिका सादर करण्यास 5 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ

 

 

        ठाणे, प्रतिनिधी(जिमाका) : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत घेण्यात येणाऱ्या, राज्य नाट्य स्पर्धेतील प्रवेशिका सादर करण्यास 5 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य नाट्य स्पर्धेतील हौशी मराठी, हिंदी, संस्कृत, संगीत, बालनाट्य व दिव्यांग बालनाट्य या वर्गवारीसाठी प्रवेशिका सादर करण्याचा अंतिम दि. 26 ऑगस्ट 2024 हा होता. मात्र काही नाट्यसंस्था व संघटनांनी या प्रवेशिका सादर करण्यास मुदतवाढ द्यावी, अशी मागणी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केलेली होती. जास्तीत जास्त संघाना या स्पर्धेत भाग घेता यावा यासाठी, प्राप्त झालेल्या निवेदनांचा विचार करून सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रवेशिका सादर करण्यास मुदतवाढ देण्यात यावी, अशी सूचना सांस्कृतिक कार्य संचालनालयास केली होती.

 

या सूचनेच्या अनुषंगाने प्रवेशिका सादर करण्यास दि. 5 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी दिली आहे.

 

या मुदतवाढ निर्णयाच्या अनुषंगाने, राज्य नाट्य स्पर्धेतील हौशी मराठी, हिंदी, संस्कृत, संगीत, दिव्यांग बालनाट्य, बालनाट्य या स्पर्धेत भाग घेण्यास इच्छुक असलेले संघ, ऑनलाइन पद्धतीने दि.५ सप्टेंबर 2024 पर्यंत प्रवेशिका सादर करू शकतील, असे सांस्कृतिक कार्य संचालनालयाने कळविले असून संबंधित संघांनी https://mahanatyaspardha.com या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा, असे आवाहन संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.

 

000000000

संबंधित पोस्ट

लोकसभेच्या निवडणूका राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी स्वबळावर लढणार…

vishwatmaklokswamivarta

म्हसळा ग्रामीण रुग्णालयातील डायलिसिस सेंटरचे महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांच्या हस्ते लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

मेहकर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु

ग्रंथभेट योजनेसाठी सन 2025 कॅलेंडर वर्षातील प्रकाशित ग्रंथ 28 फेब्रुवारीपर्यंत सादर करावेत- प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर

vishwatmaklokswamivarta

दक्षता जनजागृती सप्ताह’ निमित्त कोकण भवनात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या भित्तिपत्रकाचे अनावरण