
शेतकऱ्यांनी कर्जमुक्ती प्रोत्साहनपर लाभ योजना मयत वारस कर्ज खात्याबाबत
बुलडाणा,(जिमाका), : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेमध्ये पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यापूर्वीच निधन झाल्याने त्यांना प्रोत्साहन लाभ रक्कम अदा करता आलेली नाही, अशा मयत शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांबाबत करावयाच्या कार्यवाहीबाबत महा-आयटीकडून आदर्श कार्यपध्दती प्राप्त झालेली आहे.
मयत शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची माहिती योजनेच्या संगणकीय प्रणालीवरून काढून टाकण्याची सुविधा बँकांना दि. 17 स्पटेंबर 2024 पर्यत कालावधीत उपलब्ध राहील. मयत शेतकऱ्यांच्या वारसांची नोंद संबंधीत कर्जखात्यास करुन त्याबाबतची माहिती संगणकीय प्रणालीवर सादर करण्याची सुविधा दि. 18 सप्टेंबर 2024 ते दि. 26 सप्टेंबर 2024 या कालावधीत उपलब्ध राहील. तथापि प्रोत्साहनपर लाभ योजनेमध्ये पात्र ठरलेल्या मयत शेतकऱ्यांच्या वारसांनी आवश्यक कागदपत्रे संबंधीत बँकेकडे विहीत कालावधी मध्ये जमा करावी. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आधार प्रमाणिकरण केलेले नाही, अशा शेतक-यांनी संबंधीत बँक शाखांशी संपर्क साधुन दि. 18 सप्टेंबर 2024 पर्यंत आधार प्रमाणीकरण पुर्ण करुन घ्यावे. असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, बुलढाणा यांचे मार्फत करण्यात येत आहे. ********



