vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मलिदा लाटनाऱ्यांचा आपल्यावरील चिखलफेकीचा प्रयत्न हास्यास्पद–आ. कैलास गोरंटयाल यांचा जोरदार पलटवार 

मलिदा लाटनाऱ्यांचा आपल्यावरील चिखलफेकीचा प्रयत्न हास्यास्पद–आ. कैलास गोरंटयाल यांचा जोरदार पलटवार

—————————————-

जालना (प्रतिनीधी) शेतकऱ्यांच्या मालकीच्या असणाऱ्या जालना कारखान्याच्या मालमत्तेवर दरोडा टाकून मलिदा लाटनाऱ्यांनी आपल्यावर चिखलफेक करण्याचा केलेला प्रयत्न हास्यास्पद असल्याचा पलटवार आ. कैलास गोरंटयाल यांनी माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचा नामोल्लेख न करता लगावला आहे.

जालना येथील मोती तलावात श्री विसर्जनासाठी नांदेड येथून आलेल्या जीवरक्षक दलातील तरुणांना अंगावरील टीशर्ट काढण्याची धमकी माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आली होती. जालना महानगर पालिकेने नियमांचे सर्व सोपस्कार पार पाडत श्री विसर्जनासाठी नांदेड येथील सदर एजन्सीची निविदा मंजूर केलेली आहे. नियमानुसार काम मिळाल्यानंतरही माजी राज्यमंत्र्यांच्या समर्थकांनी टक्केवारीसाठी मुद्दाम त्रास देण्याचा प्रयत्न केल्यानंतर आ. कैलास गोरंटयाल यांनी समाज माध्यमांवर मुंबई येथून एक व्हिडिओ व्हायरल करत माजी राज्यमंत्र्यांवर टीकेची झोड उठवली होती. या टिकेनंतर वादाची ठिणगी पडली. माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी आज बुधवारी केलेल्या टीकेला आ.गोरंटयाल यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. शेतकऱ्यांच्या मालकीच्या असणाऱ्या जालना (रामनगर) सहकारी साखर कारखान्याची जमीन हडप करून या कोटयावधी रुपयांच्या मालमत्तेवर कुणी दिवसा ढवळ्या दरोडा टाकला हे जालना विधानसभा मतदार संघातील जनतेला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. केवळ मालमत्तेवर दरोडा टाकला नाही तर सदर कारखान्यातील चांगल्या स्थितीत असणाऱ्या मशिनारीची देखील भंगारच्या नावाखाली या महाशयांनी पद्धतशीरपणे विल्हेवाट लावली. एव्हढेच नव्हे तर जवळच्या मित्रांच्या कोटयावधी रुपये किमतीच्या जमिनी, मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न या महाशयांनी केला. त्यांच्या जवळचे मित्र असलेले स्व.अभय आबड यांची जमीन हाडपण्याचा प्रयत्न देखील या भूमाफियाने केला होता. तसा आरोप स्व.अभय आबड यांचे चिरंजीव अंकित आबड यांनी केला असून या प्रकरणात हस्तक्षेप करून आपण त्यांचे हे सर्व प्रयत्न हाणून पाडले आहे. या बाबी आता सर्वश्रुत झाल्या असून लपून राहिलेल्या नाहीत. दरोडेखोर, भंगार चोर, भूमाफिया अशी प्रतिमा असणाऱ्यांनी आपल्यावर कितीही चिखलफेक करण्याचा प्रयत्न केला तरी मतदार सर्व ओळखुन आहे. येत्या निवडणुकीत जनता त्यांना त्यांची दाखवल्याशिवाय राहणार नाही असा ठाम विश्वास आ. कैलास गोरंटयाल यांनी व्यक्त केला आहे.

—————————————-

चौकट

—————-

भावाचे ऑपरेशन असल्याने मुंबईत – आ.गोरंटयाल

—————————————-

आपले बंधू पुरुषोत्तम यांच्यावर मागील पंधरा दिवसांपासून मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांचे एक ऑपरेशन करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्यामुळे आपण दोन दिवसांपूर्वीच मुंबई येथे आलो आहे. मात्र, नेमकी कोणतीही शहानिशा न करता माजी राज्यमंत्र्यांनी माझ्यावर टीका करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. निवडणूक जवळ आल्यानंतर स्वतः विकास कामांचे नारळ फोडतात. मात्र, त्यातील किती कामे मार्गी लावली हे कधीच सांगत नसल्याची टीकाही आ. गोरंटयाल यांनी केली आहे

संबंधित पोस्ट

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विशेष जनजागृती मोहिम

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये मोठी पार्टी ,सारा अली खान, सारा तेंडुलकरच्या पार्टीत कोरोनाचे नियम पायदळी…

vishwatmaklokswamivarta

मुंबई महानगर क्षेत्रात ‘पॉड टॅक्सी’साठी महापालिकांनी आराखडा तयार करा- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’ला प्राधान्य देण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन.

vishwatmaklokswamivarta

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान विभागाचे ठाणे महानगरपालिका पार्किंग प्लाझा येथे स्थलांतर..

रायगड जिल्हा सार्वजनिक आरोग्य विभाग आणि स्वदेस फाउंडेशन यांच्यातसात तालुक्यामध्ये आरोग्य सुधारण्यासाठी सामंजस्य करार

कृषी विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी-व्यक्ती,गट, संस्थानी प्रस्ताव सादर करावेत